घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआर्थिक वादातून व्यापाऱ्यांचे अपहरण करुन हत्या ?

आर्थिक वादातून व्यापाऱ्यांचे अपहरण करुन हत्या ?

Subscribe

बेपत्ता व्यावसायिकाचा मृतदेह मालेगावाच्या कालव्यात सापडला, नाशिकरोड भागातील व्यावसायिकांत खळबळ,

नाशिकरोड : येथील एकलहरे रोड वरील शाळेचे बॅंच बनविणा-या कारखान्याचे संचालकाचे अपहरण करत मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात मृतदेह मिळून आला, मृत सोनवणे यांच्या शरिरावर गंभीर जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे, शिरिष गुलाबराव सोनवणे (५६) रा. के.जे.मेहता हायस्कुल नाशिकरोड असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, नाशिकरोड पोलीस तपास करत आहे.

समजलेली माहिती अशी, एकलहरे रोड वरील स्वस्तीक फर्निचर या कारखान्यात शाळेत विद्यार्थ्यांसाठी लागणारे बेंच तयार केले जातात, या कारखान्याचे मालक शिरिष गुलाबराव सोनवणे (५६) रा. फ्लॅट नं ए-१०३, किंग्स कोर्ट, के.जे.मेहता हायस्कुल जवळ पासपोर्ट आफिस शेजारी नाशिकरोड, हे शुक्रवारी (दि.९) दुपारी साडे चारच्या सुमारास कारखान्यात असतांना एका स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्तीपैकी एकाने कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला मालक सोनवणे यांना आॅर्डर द्यायची आहे असे सांगून गाडी जवळ बोलावण्यासाठी सांगितले, मात्र, फिरोज याने आपणच कारखान्यात चला असा आग्रह धरला असता, गाडीतील व्यक्ती अपंग असून चालता येत नाही असे सांगत मालक सोनवणे यांना पेन व वही घेऊन गाडीत बोलवा, असे सांगितल्यावर सोनवणे हे सदर गाडीत बसले, दरम्यान फिरोज यास चहा आणण्यासाठी सांगण्यात आले, चहा देऊन फिरोज हा कारखान्यात गेला, बराच वेळ गेल्यानतंर मालक कारखान्यात आले नाही, परंतू सदर गाडी वळून सिन्नरफाटाच्या दिशेने जातांना कामगारांनी पाहिली, त्यानंतर सोनवणे यांच्या पत्नी उज्वला यांनी कारखान्यातील एका कामगाराला फोन करुन पती शिरिष यांचा फोन बंद येत असल्याचे सांगून विचारणा केली, यावेळी कामगारांनी बाहेर पाहिले असता मालक सोनवणे दिसून आले नाही, या नंतर शोधाशोध झाल्यानंतर फिरोज याने शनिवारी (दि.१०) नाशिकरोड पोलीस ठाण्यात  मालक सोनवणे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

- Advertisement -

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके रवाना करण्यात आले होते, मिळालेल्या माहितीच्या आधारे घोटी टोलनाका, शिंदे टोल नाका येथील सीसीटीव्ही फुटेज व फोन काॅल्सच्या आधारे तपास सुरु होता, तपास सुरु असतांना मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील पाटबंधारे कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह मिळून आल्याची माहिती मिळाली, तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक जयेश गांगुर्डे यांनी त्यांच्या नातेवाईकाकडून मृतदेहाची ओळख पटवून शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान स्वस्तीक फर्निचर कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे गेले कित्येक दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांकडून कामगार व सोनवणे यांच्या संपर्कातील लोकांचा कसून तपास सुरु आहे.

व्यवसायातील यशानंतर रेल्वेची नोकरी सोडली

थुळे जिल्ह्यातील राहणारे सोनवणे हे रेल्वेत नोकरी होते, त्यांच्या भावाचा धुळे येथे बेंच बनविण्याचा कारखाना असल्याने हा व्यवसाय मोठ्या शहरात करता येईल या उद्देशाने धुळे येथून नाशिकरोड रेल्वे स्थानकात बदली करुन घेतली, प्रथम बिटको काॅलेज समोर व नंतर सिन्नरफाटा पोलीस चौकी शेजारी बेंच बनविण्याचे काम सुरु केले, नंतर एकलहरे रोड परिसरात पत्नी उज्वला यांच्या नावावर कारखाना सुरु केल्यानंतर व्यवसायातील मिळत असलेले यश बघता त्यांनी रेल्वेच्या नोकरीला राजीनामा दिला, त्यांचा मुलाने अमेरिकेत नोकरी करत आहे, तर विवाहित मुलगी डाॅक्टर आहे. राज्यासह देशातील अनेक राज्यातून व्यावसायिक संस्था बेंच खरेदीसाठी येत असल्याचे समजते, कारखान्याच्या माध्यमातून तयार झालेल्या बेंचला देशभरात प्रसिद्धी मिळालेल्या या व्यावसायिकाचे अपहरण करुन हत्या कोणी केली याचा तपास नाशिकरोड पोलीस करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -