घरताज्या घडामोडीKirit Somaiya : चहावाल्याला १०० कोटींचे कोविड सेंटरचे कंत्राट, बेनामी पार्टनर ठाकरे...

Kirit Somaiya : चहावाल्याला १०० कोटींचे कोविड सेंटरचे कंत्राट, बेनामी पार्टनर ठाकरे – राऊतांनी सांगावेत – किरीट सोमय्या

Subscribe

किरीट सोमय्यांच्या समर्थनार्थ पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर परवानगी नसतानाही किरीट सोमय्यांचा सत्कार केला. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. घोटाळ्याबाबतची तक्रार करताना किरीट सोमय्यांवर हल्ला झाला होता. या प्रकरणातच किरीट सोमय्यांनी कोविड सेंटरच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटरचे कंत्राट दिलेली कंपनी जाहीर करावी, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. या कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही किरीट सोमय्या म्हणाले. एक चहावाल्याला १०० कोटींचे कंत्राट मिळते, या कंपनीचे बेनामी पार्टनर कोण हे ठाकरे आणि राऊत यांनी सांगावे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही 

गेल्या शनिवारी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. ज्या कोविड सेंटरच्या कंपनीला काम दिले त्या कंत्राटदाराचे मुख्यमंत्र्यांनी नाव सांगावे, असेही आव्हान त्यांनी दिले. मी पुणेकरांना त्याचे नाव सांगतो, अशा शब्दात. कोविड सेंटर कंपनी जी कधीच नोंदणी झाली अशी कंपनी आहे. केईएम हॉस्पिटलच्या मागच्या बाजुला एक चहावाला आहे, तो या कंपनीचा मालक आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या जनतेशी खेळ केला आहे. संजय राऊत यांच्या मित्राची ही कंपनी आहे, या कंपनीला १०० कोटींचे कंत्राट देण्यात आले. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केल्यावर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी मुंबईतल्या कोविड सेंटरचे कंत्राट या कंपनीला दिले. या कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय किरीट सोमय्या गप्प बसणार नाही.

- Advertisement -

मुंबई महापालिका, पीएमआरडीएने चहावाल्याला १०० कोटींचे कंत्राट दिले. ज्या पद्धतीने कोविड सेंटर चालवताना जे गैरप्रकार झाले आणि लोक मृत्यूमुखी पावले, त्या कंपनीवर उद्धव ठाकरे गुन्हा दाखल करणार का ? असाही सवाल किरीट सोमय्या यांनी केला. कोविड पेशंटच्या जिवाशी खेळण्याचे काम संजय राऊतांच्या मित्र परिवाराच्या नामी बेनामी कंपन्यांनी केले आहे. मी पुणे पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारू शकतो, की गेल्या शनिवारी तक्रार दिल्यानंतर ज्यांनी कोरोना रूग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कंपन्यांविरोधात गुन्हा का दाखल झालेला नाही ? असाही सवाल त्यांनी केला.

तक्रार दाखल करण्याचे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

महापालिका आयुक्तांनी मान्य केले की, कोविड कंपनी बोगस होती. दहा दिवसाच्या आत एक डॉक्टरही आणला नाही. अवघे १५ टक्के पेशंट आणण्यासही कंपनीला यश आले नाही. त्यामुळे अनेक रूग्णांचे हाल झाले. महापालिका आयुक्तांनी पीएमआरडीएने पत्र लिहिले, की कंपनीला टर्मिनेट करा. पण पीएमआरडीएने ९ दिवस घेतल्याने आणखी ३ मृत्यू झाले. त्यानंतर पीएमआरडीने लिहिले की ही कंपनी बोगस आहे, ही कंपनी बोगस आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी वरळी एनएससीआयचे कंत्राट दिले. त्यानंतर मुंबई महापालिकेने ७६ कोटींचे कंत्राट दिले. महापालिका आयुक्तांनी मान्य केले की या कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे भेटी दरम्यान सांगितले असे किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -