घरताज्या घडामोडीअनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे, किरीट सोमय्यांचा दावा

अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे, किरीट सोमय्यांचा दावा

Subscribe

प्रकरणांची राज्यपाल, उच्च न्यायालय, लोकायुक्तांनी घेतली दखल

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांना चांगलेच सळो की पळो करुन सोडले आहे. मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणून संबंधित मंत्र्यांना यंत्रणांची कारवाई सुरु केली आहे. यामध्ये परिवहन मंत्री आता अवघ्या २ महिन्यांचे पाहूणे असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता अनिल देशमुख यांचा नंबर असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. अनिल परब यांच्यावर एकुण ६ प्रकरणांमध्ये चौकशी सुरु आहे त्यामुळे किरीट सोमय्यांचा दावा खरा निघाल्यास अनिल परब आपल्या पदाा राजीनामा देतील का असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

माजी गृहमंत्री अनिल परब यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. आता परिवहन मंत्री अनिल परब यांची अडचण वाढली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात काही पुराव्यांसह आरोप केले आहेत. कोकणातील रिसॉर्टचे प्रकरण,आरटीओ घोटाळा, गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात आरटीओमध्ये सुरु असलेल्या कामांविरोधात तक्रार दाखल केली आहे. परिवहन विभागात बदल्यांचे रॅकेट अशा प्रकरणांचा उलघडा केला आहे.

- Advertisement -

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात आरटीओ ट्रान्सफर, एसटी तिकीट, दापोलीचा रिसॉर्ट, म्हाडाची जमीन, बीएमसी कंत्राटदार या घोटाळ्यांचा पुराव्यानिशी आरोप केला आहे. या प्रकरणात चौकशी सुरु आहे. यातील काही प्रकरणांची राज्यपाल, उच्च न्यायालय, लोकायुक्तांनी दखल घेतली आहे. तसेच सीबीआय, ईडी,एनआयए,नाशिक पोलिस,पर्यावरण मंत्रालय, जिल्हाधिकारी या विविध पातळीवरील यंत्रणांचा तपास सुरु आहे. यामुळेच अनिल परब येत्या २ महिन्यांचे पाहुणे असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -