घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरीत क्रीडा प्रबोधिनीसाठी १ कोटी ३० लाख मंजूर

इगतपुरीत क्रीडा प्रबोधिनीसाठी १ कोटी ३० लाख मंजूर

Subscribe

कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात होणार बंदिस्त प्रेक्षागृह

आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या टाके घोटी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात बंदिस्त प्रेक्षागृह बांधण्यासाठी सुमारे १ कोटी ३० लाखांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.

जिल्ह्यातील विशेषतः इगतपुरी, पेठ, सुरगाणा या आदिवासी बहुल भागात कविता राऊत, ताई बामणे या आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावणार्‍या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करण्याचे स्वप्न पाहणार्‍या क्रीडापटूंना या प्रबोधिनीच्या माध्यमातून मोठी मदत होणार आहे, येथून दर्जेदार खेळाडू घडतील, असा विश्वास आमदार खोसकर यांनी व्यक्त केला. हा निधी मिळवून आणल्याबद्दल मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोजी आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले तसेच इगतपुरीचे संचालक भाऊसाहेब खातळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य डॉ. देविदास गिरी, गोवर्धने बाबांचे नातू प्रशांत गोवर्धने, जयंत गोवर्धने, सांजेगावच्या सरपंच नीता गोवर्धने, प्रतिक गोवर्धने, तसेच सर्व सांजेगाव ग्रामस्थ यांच्या वतीने खोसकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -