घरमहाराष्ट्रम्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी इंजेक्शनचा तुटवडा - अजित पवार

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी इंजेक्शनचा तुटवडा – अजित पवार

Subscribe

पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या घटली

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यास राज्य सरकार सक्षम असल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. कोरोनासंदर्भातील आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा आणि दोन्ही शहरांची आाढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळ राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राज्य सरकार सक्षम असल्याचे सांगत दुसरीकडे म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा राज्यात तुटवडा असल्याची वस्तुस्थिती बोलून दाखवली.  राज्यात वाढणाऱ्या म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनसंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, सध्या महाराष्ट्रमध्ये ३०० पेक्षा जास्त जिल्हे आणि शहारांमध्ये ब्लॅक फंगस हा कोरोनानंतरचा एक प्रकार पुढे आलेला आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा आणि दोन्ही शहारांत बाहेरचे रुग्ण बऱ्यापैकी अॅडमिट झालेले आहेत. परंतु या ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनचा तुटवडा आहे. कारण हा आजार झालेल्या रुग्णास दिवसाला सहा इंजेक्शन द्यावी लागत आहे. या इंजेक्शन देण्याचे प्रमाण इतके मोठे आहे की म्हणजे महिन्याभरात काही लाख रुपयांची इंजेक्शन त्या रुग्णास द्यावी लागत आहेत. म्हणूनच राज्यातील मुख्यमंत्र्यांसह, आरोग्यमंत्री राजेश टोपे मिळून निर्णय घेत म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करु शकता असे आदेशही काढले. तसेच आम्ही या आजारावरील इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला परंतु ही इंजेक्शने केंद्राच्या हातात देण्याचे आदेश  दिले असल्याचे कंपनीने सांगितले. असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

केंद्र ठरवणार कोणत्या राज्याला किती इंजेक्शन द्यायचे. रेमडेसिवीर इंजेक्शन प्रमाणे याही इंजेक्शनवर सुसूत्रता आणण्याचा राज्याने प्रयत्न केला. परंतु अठराशे इंजेक्शन तर पुणे जिल्हा आणि दोन्ही शहरांना लागत आहेत. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजारावर इंजेक्शनचा तुटवडा आहे हे ही वस्तूस्थिती मी लक्षात आणून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या वतीने म्युकरमायकोसिस इंजेक्शन तुटवड्याची गोष्ट पंतप्रधान मोदींच्या कानावर घातली आहे. त्यामुळे इंजेक्शनच्या मागणीप्रमाणे पुरवठा होईल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार तिसऱ्या लाटेशी लढण्यास सक्षम असून लहान मुलांसाठी कोविड सेंटर्स उभारण्यातं काम सुरु आहे. कारण तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनी कोरोनाचा धोका अधिक असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पुण्यातल्या येरवड्यातही लहान मुलांसाठीचं १०० बेड्स कोविड सेंटर आजपासून सुरु झालं असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर लसींच्या मागणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणं सुरु आहे. पुणे, मुंबई महानगरपालिकांनी लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या घटली

यावेळी त्यांनी पुण्यात पॉझिटिव्हची संख्या कमी होत असून डिस्चार्जची संख्या ही बऱ्यापैकी वाढत असल्याची दिलासाजनक बातमी दिली, तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातील आणि दोन शहरांतील सर्वप्रकारचे बेड मग ते खासगी रुग्णालयांमध्ये असतील किंवा सरकारी किंवा राज्य सरकारच्या रुग्णालयातही उपलब्ध आहेत. यात ऑक्सिजन बेडस, व्हेंटिलेटर बेड्स ही उपलब्ध आहेत. पण ग्रामीण भागात अद्यापही जेवढ कोरोना आटोक्यात आला पाहिजे तेवढा आलेला नाही त्यामुळे बऱ्याच सुचना आमदारांनी केलेल्या आहेत. असल्याची खंत व्यक्त केली.

- Advertisement -

रेमडेसिवीर इंजेक्शन बंदीवर खोलात जात नाही 

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा अजिबात राहिलेला नाही परंतु टास्क फोर्सने असे सांगितले की, रेमडसिवीर कोरोना झालेल्या रुग्णांना जास्त देण्याचे कारण नाही. त्यातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्याच्या खोलात मी जात नाही. कारण तो वैद्यकीय़ क्षेत्रातील तज्ज्ञांचा तो अधिकार आहे. त्यामध्ये केंद्र सरकारची पण टीम जी काम करतेय त्यांनी प्लाझ्मा आणि रेमडेसिवीरबद्दल त्यांचे स्पष्ट मत व्यक्त केलेल आहे आणि त्यावर प्रसिद्धपत्रकही काढले. असे स्पष्ट केले.

पिंपरी चिंडवड परिसरातून ४८० घरांची लॉटरी

पिंपरी चिंडवड परिसरातून ४८० घरांची लॉटरी निघाली, तो कार्यक्रम झाली. अजून पुढच्या टप्प्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातच ६००० घरांची लॉटरी काढण्याचा कार्यक्रम होईल. त्या घरांचे बांधकाम सुरु असून बांधकाम झाल्यानंतरच्या टप्प्यामध्ये अजून ६००० घरांचा इकोनॉमिविकर सेक्शनच्या लोकांकरिता कार्यक्रम घेत तिथेही तिथल्या नागरिकांनाकरिता घरे उपलब्ध करुन देणार आहोत. साधारण केंद्र सरकारने ठरवले आहे की २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर द्यायचे परंतु तसे बघायला गेल्यास हे अवघड आहे. पण तरी देखील तिथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राज्य सरकार देखील करतयं आणि मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडाच्यामार्फत, झोपडपट्टी पुर्नवसन योजना (एसआरए) च्या मार्फत तसेच प्राधिकरणाच्या मार्फत अशा प्रकारचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. टप्याटप्प्यामध्ये पूर्ण होत आहेत तशी घरे आम्ही लॉटरीच्या मार्फत कुठल्याही प्रकारची वशीलेबाजी न राहता पूर्णपणे पारदर्शकतेने तो कार्यक्रम सुरु ठेवणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -