घरमहाराष्ट्ररोह्यात भूमाफियांचा हैदोस

रोह्यात भूमाफियांचा हैदोस

Subscribe

बोगस प्रकाराचा पर्दाफाश

तालुक्यात चणेरेसह अन्य भागात जमीन खरेदी-विक्री करणार्‍या भू-माफियांनी हैदोस घातला असून, त्यातील एका प्रकरणाचा गुरुवारी पर्दाफाश झाला.घोसाळे येथील गट नंबर 71 चा व्यवहार गुरुवारी होणार होता. त्यावेळी दुय्यम निबंधक ए. पी. बोरावके यांच्या सतर्कतेने जमीन विक्री करणार्‍या मालकाचे ओळखपत्र बोगस असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी बोगस मालक म्हणून उभ्या असलेल्या व्यक्तीने आपल्याला 400 रुपये दिवसाच्या हजेरी रकमेवर येथे उभे केले असल्याचे धक्कादायक विधान केले. तालुक्यात जमिनींना भाव आल्याने दिवसाच्या मजुरीवर बोगस व्यवहार एजंटमार्फत केले जात असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व चार संशयास्पद व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आपल्याकडे दस्त नोंदणीसाठी आल्यानंतर आधार कार्ड व पॅनकार्ड यांची खातरजमा केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले. तातडीने रोहे पोलिसांना याची माहिती दिली.
-ए. पी. बोरावके, दुय्यम निबंधक, श्रेणी १

- Advertisement -

रोहे तालुक्यात जमिनीचे बोगस व्यवहार होत आहेत. यात सरकारी अधिकारी सामील असल्याने हे प्रकार घडत आहेत. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हे प्रकार घडत आहेत. मराठी माणसाला इस्रायली नागरिक म्हणून उभा करून व्यवहार करण्या इतपत दलालांचे धारिष्ट्य वाढले आहे.
-विजय बोरकर, उप जिल्हाप्रमुख, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -