घरमहाराष्ट्रठाण्यात रस्ता खचून तीन वाहनांचे नुकसान

ठाण्यात रस्ता खचून तीन वाहनांचे नुकसान

Subscribe

या दुर्घटनेमधील वाहनांमध्ये एकही व्यक्ती उपस्थित नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

ठाण्यातील कामघर रूग्णालया येथील परिसरात अचानक रस्ता खचल्याची घटना घडली. हा रस्ता खचल्याने तीन वाहन्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन चारचाकी आणि एक ऑटो रिक्षा या वाहनांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

ही घटना कामघर रुग्णालयाजवळील रामचंद्र नगर येथील राजमुद्रा सोसायटी जवळ अचानक रस्ता खचल्याने घटनास्थळी उभ्या असलेल्या दोन कार आणि एक रिक्षा त्या खचलेल्या रस्त्यात कोसळल्या. ही घटना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

या दुर्घटनेमधील वाहनांमध्ये एकही व्यक्ती उपस्थित नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणाही जखमी झालेले नाही. रस्ता खचण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाडीसह पोलीस घटनास्थळी दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -