घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये ११ व्या दिवशी घसरण; पहा आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये ११ व्या दिवशी घसरण; पहा आजचे दर

Subscribe

शनिवारी पेट्रोलच्या दरामध्ये १९ ते २० पैसे प्रति लिटर इतकी कापत झाली आहे. तर डिझेलच्या दरामध्ये २४ ते २६ पैसे प्रति लिटर कपात झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सलग ११ व्या दिवशी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवासांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होत चालली आहे. त्यामुळे कुठे तरी मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. शनिवारी पेट्रोलच्या दरामध्ये १९ ते २० पैसे प्रति लिटर इतकी कापत झाली आहे. तर डिझेलच्या दरामध्ये २४ ते २६ पैसे प्रति लिटर कपात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी पेट्रोलच्या दरामध्ये १६ ते १८ रुपये प्रति लिटर कपात झाली होती. तर डिझेलच्या दरामध्ये १६ ते १७ पैसे प्रति लिटर कपात झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरामध्ये घसरत होत चालली आहे. त्यामुळे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये घट होत चलली आहे.

काय आहेत आजचे दर ?

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, शनिवारी पेट्रोलसाठी दिल्लीमध्ये ६९.९९ रुपये, मुंबईमध्ये ७५.६९ रुपये, कोलकातामध्ये ७२.१५ रुपये आणि चेन्नई ७२.७० रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी दिल्लीमध्ये ६३.९३, मुंबईमध्ये ६७.०३, कोलकातामध्ये ६५.८५ आणि चेन्नईमध्ये ६७.६२ रुपये मोजावे लागत आहेत.

- Advertisement -

३ दिवसांमध्ये ४४ पैशाने स्वस्त झाले पेट्रोल

गेल्या ३ दिवसामध्ये दिल्लीमध्ये पेट्रोल ४४ आणि डिझेल ४६ पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. शनिवारी ओएमसीने दिल्ली, मुंबई आणि कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १९ पैशांनी स्वस्त केली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल २० पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्ली आणि कोलकातामध्ये डिझेलच्या किंमतीत २४ पैशांनी घट केली आहे. तर मुंबईमध्ये २५ पैसे आणि चेन्नईमध्ये २६ पैशांनी डिझेल स्वस्त झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -