घरमहाराष्ट्रआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती;लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर कोण आहेत वाचा...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती;लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर कोण आहेत वाचा सविस्तर

Subscribe

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली. कोण आहेत डॉ. माधुरी कानिटकर? वाचा सविस्तर

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली. सध्या लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या नवी दिल्ली येथे एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) म्हणून कार्यरत आहेत. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर भारतीय लष्करातील डॉक्टर असून २९ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत. तीन स्टार रँन्क मिळालेल्या त्या देशातील दुसऱ्या महिला आहेत.

- Advertisement -

कोण आहेत माधुरी कानिटकर?

  • लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९६० रोजी झाला.
  • त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
  • एम.बी.बी.एस. च्या तिन्ही टप्प्यात पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर त्यांनी लखनौ येथे लष्करी प्रशिक्षण घेतले. एम.डी.(शिशुरोग तज्ञ) ही पदवी त्यांनी मुंबईमधून घेतली.
  •  

    तर पीडीयाट्रिक नेफ्रॉलॉजीचे प्रशिक्षण ए.आय.आय.एम.एस., नवी दिल्ली येथून पूर्ण केले. त्यांनी एम.बी.बी.एस., एम.डी.(शिशुरोग तज्ञ), डी.एन.बी.(शिशुरोग तज्ञ), फेलोशिप पीडीयाट्रिक नेफ्रॉलॉजी असे शिक्षण घेतले आहे.

  • त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.
  • लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचे यांनी विविध क्रमिक पुस्तकात १५ प्रकरणे लिहिली आहेत. तसेच त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. २०१७ मध्ये ए.एफ.एम.सी. मध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्यावर तेथे वैद्यकीय संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले.
  • विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार १० फेब्रुवारी २०२१ रोजी पूर्ण झाला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
  • कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या. कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -