Live Update : शिंदे-फडणवीस यांच्याकडून नवीन हक्कभंग समिती घोषित

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

शिंदे-फडणवीस यांच्याकडून नवीन हक्कभंग समिती घोषित

१५ जणांची हक्कभंग समिती घोषित

हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी राहुल कुल यांची निवड

उद्या सकाळी हक्कभंग समिती संजय राऊत यांना नोटीस पाठवणार


शिवसेनेचे नीरज कौल यांचा युक्तीवाद सुरु

आयोगाने गटाला दिलेली मान्यता १०व्या सूची अंतर्गत येते का ?, सरन्यायाधीशांचा कौल यांना प्रश्न

फूट पडल्यावर पक्ष सोडला जातो असे नाही, सरन्यायाधीशांची टिप्पणी

10व्या सूचीनुसार पक्षात दोन गट आहेतच – सरन्यायाधीश


फुटीला मान्यता देण्याची मागणी केली नव्हती : कौल

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार नको असे आमदारांचे मत असल्याचा कौल यांचा युक्तिवाद


सर्वोच्च न्यायालयात सलग दुसऱ्या दिवशी सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू

शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद


एसटी कर्मचाऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन

उस्मानाबादमधील कळंबमध्ये एसटी कर्मचारी सच्चिदानंद पुरी यांचे शोले स्टाईल आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता टॉवरवर चढून आंदोलन


शेतकऱ्यांच्या वीज बिलावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधान परिषदेत नियमित कामकाजपूर्वी बैठक


मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. अदानी समूहाने जो आर्थिक घोटाळा आणि भ्रष्टाचार केलेला आहे त्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने त्यांना मदत केलेली आहे, त्या निषेधार्थ हे आज सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.


गौण खनिजप्रकरणी एकनाथ खडसेंची चौकशी होणार

महसूल विभागाकडून एसआयटीची स्थापना


ऑस्ट्रेलिया पोलिसांकडून भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या

रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप


ग्रीसमध्ये प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली, १६ जणांचा मृत्यू, ८५ जण जखमी


दिल्लीत घरगुती सिलिंडरच्या दरांत ५० रुपयांची वाढ, व्यावसायिक ३५० रुपयांनी महागले


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी