Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी, गांधी...

Live Update : माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी, गांधी कोणाची माफी मागत नाहीत – राहुल गांधी

Subscribe

माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी, गांधी कोणाची माफी मागत नाहीत – राहुल गांधी

मी भारताच्या लोकशाहीसाठी लढतोय, प्रश्न विचारत राहणार- राहुल गांधी

- Advertisement -

मी तुमच्याशी खूप वेळा बोललो आहे की भारतात लोकशाहीवर आक्रमण होतंय. याची रोज नवनवे उदाहरणं मिळत आहेत. मी एकच प्रश्न विचारला होता. अदानीची शेल कंपनी आहे. त्यात २० हजार कोटी रुपये कोणीतरी गुंतवले, हा अदानीचा पैसा नाही. अदानीचा इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय आहे. हे पैसे कोणाचे आहेत, हा प्रश्न मी विचारला होता. मी संसदेत पुरावा सादर केला होता. अदानी नरेंद्र मोदी यांच्यातील नातेसंबंधात बोललो. नातं नवी नाही. गुजरातचे सीएम असताना मोदींचे त्यांच्याशी संबंध. त्याचे अनेक सार्वनिजक पुरावा आहेत. – राहुल गांधी

मी सांगितलं की विमानतळ अदानींना नियम बदलून दिले आहे. नियमांचा पुरावा दिला. चिठ्ठी लिहिली. काही फरक नाही पडला. मंत्र्यांनी माझ्याविरोधात चुकीचं सांगितलं. मी परदेशी ताकदींकडून मदत मागितली. संसदेचा नियम आहे. कोणत्याही सदस्यांवर आरोप लागला तर त्यांना उत्तर देण्याचा हक्क असतो. मी चिठ्ठी लिहिली त्यांचं उत्तर नाही आलं. मग मी स्पीकरकडे गेलो. हा नियम आहे. यांनी चुकीचे आरोप लावले आहेत. मला बोलू दिलं गेलं नाही. मी बोलायला देऊ शकत नाही असं स्पीकर म्हणाले. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं. नरेंद्र मोदींचं अदानीसोबत काय नातं आहे आणि २० हजार कोटी रुपये कसले आहेत हे मी विचारत राहणार, मला याचं काहीही वाटत नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढतोय. मी कोणालाही घाबरत नाही- राहुल गांधी


- Advertisement -

देशात लोकशाहीवर आक्रमण होत असल्याचे वारंवार म्हणालो

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा


लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८(३)च्या घटनात्मक वैधतेला आव्हान

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, तातडीने सुनावणी घेण्याची विनंती


संजय राऊतांवरील हक्कभंग प्रकरण राज्यसभेत जाणार?

राज्यसभेचा अभिप्राय घेणार


  • अनेक लोक आहे झुकत, वाकत आणि गुडघे टेकत नाही. राहुल गांधी या परिस्थितीला सामोरे जात आहेत. त्यांनी जुलमी सरकारपुढे झुकण्यास नकार दिला आणि लोकसभेचे सदस्यत्व गमावलं.
  • निवडणूक आयोगाच्या हाताला हात घालून शिवसेना चोरली
  • मालेगावच्या सभेला येणाऱ्या मुस्लिम बांधवांचं स्वागत. मालेगावात कोण चोर आहेत.चोरमंडळ घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मालेगावातून याची सुरुवात होईल.
  • राज ठाकरे, राणे, शिंदे आणि फडणवीस फक्त उद्धव ठाकरेंविषयी बोलतात
  • शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढून पाच आमदार निवडून आणावे – संजय राऊत
  • उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी, राजकीय परिस्थितीवरील भाष्य ऐकण्यासाठी जनता उत्सुक आहे. लोकांचा उत्साह आणि प्रतिसाद दिसतोय. ही खरी शिवसेना आहे. त्या शिवसेनेचं स्वरुप आणि रुप मालेगावातील जनतेला पाहाता येईल. ठाकरे आणि रश्मी ठाकरे उद्या पाच वाजता मालेगावात येतील,. शिवसेनेचे सर्व नेते उद्यापर्यंत पोहोचतली, पदाधिकारी पोहोचले आहे. सभा उत्तर महाराष्ट्रात असली तरीही ती सभा संपूर्ण महाराष्ट्राची असेल. देशात लोकशाही अजिबात राहिलेली नाही. विरोधी पक्षाला अजिबात स्थान मिळू द्यायचं नाही. लोकशाही नष्ट करायची. जे आवाज उठवतील, विरोधात बोलतील त्यांना न्यायालय आणि तपास यंत्रणाच्या माध्यमातून नष्ट करायचं. अशापद्धतीचं दळभद्री राजकारण सुरू आहे – संजय राऊत
  • लोक आपल्याला मिंधे आणि खोके का बोलतात हे त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे. छी थू नष्ट करायची असेल तर निवडणुकांना सामोरे जा. ज्या ठाकरे नावावर निवडून आला आहात त्यांच्याशी बेईमानी केल्याने लोक तुमच्यावर चिडले आहेत. तुम्ही क्रांती किंवा बंड केलं असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा मग कळेल खरी शिवसेना कोणती आणि कोणती खोटी हे कळेल – संजय राऊत

लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका


लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी सरकारची अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी धावाधाव

सर्वपक्षीय गटनेत्यांची बोलावली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार बैठक

बैठकीला दोन्ही सभागृहाचे गटनेते,विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती राहणार उपस्थित

विधानभवनात आज सकाळी साडेदहा वाजता बैठक

लोकपाल विधेयकावर विरोधकांची संमती मिळवण्यासाठी सरकारकडून फ्लोअर मॅनेजमेंट


कृष्णा नदीच्या विरोधात सांगलीकरांचे आंदोलन

आंदोलनात राजू शेट्टीचांही सहभाग

सांगलीमध्ये मानवी साखळी करून आंदोलन


राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी – आशिष देशमुख


ठाकरे गटाचे संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

प्रकरणाचा छडा लावण्याकरता संजय जाधवांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलीस संरक्षण देण्याची मागणी


राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा आजा शेवटचा दिवस

अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री आज उत्तर देणार


 

- Advertisment -