घरदेश-विदेशLive Update : बेस्टची वाहतूक सुरळीत होईपर्यंत एसटी बसेस देणार सेवा -...

Live Update : बेस्टची वाहतूक सुरळीत होईपर्यंत एसटी बसेस देणार सेवा – एसटी महामंडळ

Subscribe

बेस्टची वाहतूक सुरळीत होईपर्यंत एसटी बसेस देणार सेवा

बेस्ट मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने त्यांच्या अनेक बसेस रद्द करण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्ट ने या संदर्भात एसटी कडे जादा बसेस सोडण्याची मागणी केली. त्यानुसार आज पासून बेस्टच्या 6 डेपोला प्रत्येकी 25 याप्रमाणे 150 बसेस एसटीने पुरविलेल्या आहेत. बेस्टची वाहतूक सुरळीत होईपर्यंत सदर बसेस बेस्टच्या ताफ्यामध्ये सेवा देतील!

- Advertisement -

हिंगोली गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी फरार घोषित

आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर

- Advertisement -

भारताविरूद्धच्या मालिकेसाठी आयर्लंड संघाची झाली घोषणा


नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल


18 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोनिया सेठी, रुपिंदर सिंग, गोरक्ष गाडीलकर, प्रकाश बी. खपले यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत


महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या (5 ऑगस्ट) बैठक

उद्या दुपारी 12 वाजता नेहरू सेंटर, मुंबई येथे होणार बैठक


नितीन देसाईंच्या अंत्ययात्रेला सुरूवात


आ रहा हूं… सवाल जारी रहेंगे – राहुल गांधी

सुप्रीम कोर्टाचा निर्णयानंतर काँग्रेसकडून आणखी एक ट्वीट


सुप्रीम कोर्टाचा निर्णय येताच काँग्रेसने केले ‘सत्यमेव जयते’ ट्वीट

मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना दिलासा

आडनाव मानहानी प्रकरणी शिक्षेला न्यायालयाने दिली स्थगिती


ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात

एन. डी. स्टुडिओतील जोधा अकबरच्या सेटवर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार


प्राप्तिकर विभागाकडून कल्पतरू बिल्डरवर छापेमारी

कर चोरी केल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई

मुंबई आणि आसपासच्या भागात सर्च ऑपरेशन सुरू


कांदिवलीतील डहाणुकरवाडी येथील एका इमारतीच्या 16 मजल्यावर आग

डहाणुकरवाडी मेट्रो जवळील जे. पी. ऑर्किड इमारतीत आग

अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल


मरिन लाईन्स येथील एका म्हाडाच्या इमारतीची भिंत कोसळली

घटनेत तीन जण जखमी

जखमींना जी. टी. रुग्णालयात केले दाखल


नितीन देसाई यांचे पार्थिव एन.डी. स्टुडिओमध्ये दाखल

नितीन देसाई यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयातून एन. डी. स्टुडिओकडे रवाना

नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे. जे. रुग्णालयात दाखल

नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जे. जे. रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

कर्जतच्या एन. डी. स्टुडिओमध्ये पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवले जाणार


सकाळी 7 वाजल्यापासून कर्जत-कल्याण रेल्वे वाहतूक विस्कळीत

भिवपुरी रेल्वे स्टेशनवरील उपट्र्रॅकला पडला खड्डा


राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस

आज सभागृहात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता

शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहात नेमके काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार


तिसऱ्या दिवशीही मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

या संपात सुमारे 9 हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याची माहिती

आझाद मैदानात बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात

प्रज्ञा खजूरकर यांना पाठिंबा देण्यासाठी 1 ऑगस्टपासून घाटकोपर आगारमधील 280 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपावर जात संपाला दिला पाठिंबा

मुंबईमधील विविध आगारातील कंत्राटी कर्मचारी संपावर

मोठ्या संख्येने हे कर्मचारी आझाद मैदानात दाखल होत असल्याची माहिती


लोकसभेत दिल्ली सेवा बिल मंजूर, आता राज्यसभेत हे बिल मंजूर होते का? याकडे सर्वांचे लक्ष


केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा पुण्यात येणार

6 ऑगस्टला अमिस शहा यांचा पुणे दौरा

पुण्यात सहकार विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -