घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आम्हीं मागां हन सांगितलें । जें देहींचि ब्रह्मत्व पावले । ते येणें मार्गें आले । म्हणौनियां ॥
जिवंतपणीच काही लोक ब्रह्म झाले म्हणून आम्ही पूर्वी तुला सांगितले, ते तरी या योगमार्गाने आले म्हणूनच;
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हे पार । पातले ते ॥
आणि म्हणूनच ते यमनियमरूपी योगमार्गाचे डोंगर व योगाभ्यासरूप सागर ओलांडून पार झाले;
(ब्रह्मत्व पावले;)
तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप । मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले ॥
आणि त्यांनीच आपल्या स्वतःला उपाधिरहित करून प्रपंच अजमावला, म्हणून ते स्वतः खर्‍या ब्रह्माचे स्वस्वरूप बनून राहिले.
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणौनि चमत्कारला ॥
याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णांनी योगयुक्तीचा अभिप्राय प्रदर्शित केला, तेव्हा अर्जुन मार्मिक होता, म्हणून त्याला मोठा चमत्कार वाटला.
तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । काई पां चित्त उवाइलें । इये बोली तुझें? ॥
हे पाहून कृष्ण त्याच्या मनातील उद्देश जाणून हास्यवदनाने पार्थास म्हणाले,‘मी जे सांगितले, त्यामुळे, तुझे मन का बरे प्रसन्न झाले?’
तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, ‘देवा, दुसर्‍याच्या मनातील अभिप्राय जाणणारांचे तुम्ही राजे आहात, यामुळे माझ्या मनातील भाव तुम्ही चांगला जाणला.
म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें । तें आधींचि जाणितलें देवें । तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि ॥
देवा, मी जे काही तुम्हास विचारपूर्वक विचारावे, ते तुम्ही आधीच जाणले, तर तुम्ही जे काही म्हणता, ते अधिक स्पष्ट करून सांगा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -