घरदेश-विदेशLive Update : अहमदनगरच्या किर्लोस्कर कॉलनीत गोळीबार

Live Update : अहमदनगरच्या किर्लोस्कर कॉलनीत गोळीबार

Subscribe

अहमदनगरच्या किर्लोस्कर कॉलनीत गोळीबार

मिठाई दुकानदार धीरज जोशी गंभीर जखमी

- Advertisement -

निखिल वागळे हल्ल्याप्रकरणी 10 जणांना अटक


मध्य रेल्वेचे मागील 5 तासांपासून वेळापत्रक विस्कळीत

- Advertisement -

मोटरमन मुरलीधर शर्माच्या आत्महत्येनंतर मोटरमन कामावर उपस्थित नसल्याने वेळापत्रक विस्कळीत


खासदार राहुल शेवाळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी लोकसभेत केली

अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखील होती. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल यांनी लोकसभेत केली.


पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून रिक्षात गोळीबार

अनिल दमाले याने आकाश जाधव याच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली

अनिल ढमाले याने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली


मध्य रेल्वेच्या 84 लोकल रद्द, प्रवाशांना नाहक त्रास

मोटरमनच्या आत्महत्येमुळे लोकोपायलटकडून कामात असहकार्य


बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अजित पवार यांच्या उपस्थितीत बाबा सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश


अजित पवार बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित


विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न

नारी शक्ती वंदन अधिनियम ही नव्या संसदेची ओळख – पंतप्रधान मोदी

17 व्या लोकसभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले – पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून लोकसभा अध्यक्षांचे मानले विशेष आभार

संसदेतील भाषणात पंतप्रधान मोदींनीं मानले सर्वांचे आभार


उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला मातोश्रीवर दाखल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मातोश्रीवर पोहोचले


काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत केली कायदा-सुव्यस्थेबाबतची चर्चा

काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित


मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

अमरेंद्रच्या पिस्तुलातून मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर केला होता गोळीबार


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

मिथुन यांना अस्वस्थता जाणवत असल्याने कोलकाता येथील रुग्णालयात केले दाखल

छातीत दुखत असल्याने कोलकाता येथील खाजगी रुग्णालयात केले दाखल


समीर वानखेडेंच्या विरोधात PMLA अंतर्गत गुन्हा दाखल

गुन्हा नोंदविल्यानंतर ईडीने पाठवले समन्स

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

पंतप्रधान मोदी करणार समारोपाचे भाषण


मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत

कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशीराने

सिग्नल मिळत नसल्याने गाड्या 15 ते 20 मिनिटे उशीराने


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे आजपासून पुन्हा आंदोलन

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी करणार आंदोलन

अध्यादेशाचा लाभ होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याची माहिती

सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा जरांगेंचा इशारा

आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे आंतरवली सराटीत उपोषणाला बसणार

त्याआधी ते गोदापट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार

मनोज जरांगे पाटील चौथ्यांदा उपोषणाला बसणार


जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू

उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांनी घेतला अखेरचा श्वास

गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर नाशिकच्या अशोका हॉस्पिटल येथे सुरू होते उपचार

7 फेब्रुवारीला मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार


आज विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

तसेच वादळी वारे 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता

पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात वर्तवला पावसाचा अंदाज

जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -