घरताज्या घडामोडीविरोधकांची घोषणाबाजी; विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

विरोधकांची घोषणाबाजी; विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

Subscribe

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत मिळावी, या मागणीसाठी विरोधकांनी आज सकाळपासूनच आक्रमक सूर लावला होता. सभागृह सुरु झाल्यानंतर देखील विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. मात्र घोषणाबाजी थांबत नसल्यामुळे अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.


पहिल्याच अधिवेशनात नवीन आमदारांना अध्यक्षांकडून समज

राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून नागपूर येथे सुरुवात झाली. कालचा दिवस सावरकरांच्या प्रश्नांवर वाया गेल्या नंतर विरोधकांनी आज शेतकरी कर्जमाफीवरुन विधानसभा सभागृह दणाणून सोडले. विधानसभेची बैठक सकाळी ११ वाजता सुरु होताच. भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच्या व्हेलमध्ये येत घोषणाबाजी सुरु केली, तसेच मुख्यमंत्र्यांच्यासमोर बॅनर फडकविले. यादरम्यान भाजप आणि शिवसेनेचे नवीन आमदार एकमेकांसमोर आल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही बाजूंच्या नवीन आमदारांना विधानसभेचे नियम पाळण्याची समज दिली.

- Advertisement -

 


 

- Advertisement -


 

शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन गदारोळ होण्याची शक्यता

शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन गदारोळ होण्याची शक्यता

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 16, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -