घरदेश-विदेशLive Update : गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांकडून मनुष्यबळ तैनात

Live Update : गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांकडून मनुष्यबळ तैनात

Subscribe

गणेशोत्सव बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांकडून मनुष्यबळ तैनात

डीसीपी- 15, एकूण अधिकारी (एसीपी ते पीएसआय) – 2024, पोलीस कर्मचारी – 11726,

- Advertisement -

IND vs AUS ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ
लोकेश राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

- Advertisement -

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव., अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.


पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात

दिल्लीतील संसदेच्या एनेक्सी इमारतीत बैठकीला सुरूवात


शिवसेना पक्ष आणि चिन्हावर तीन आठवड्यानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी

आमदार अपात्रतेबाबत एका आठवड्यांत सुनावणी घ्या – सुप्रीम कोर्ट

दोन आठवड्याने अध्यक्षांनी काय कारवाई केली ती सांगावी- सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करायला हवं होतं- सरन्यायाधीश

विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्ट नाराज

————————————————————————————————

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू

शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे वादावर सुप्रिम कोर्ट सुनावणी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 17 फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं. या निर्णयाविरोधातील याचिकेवर आता सुनावणी सुरू आहे.

———————————————————————————————–

नागपुरात ओबीसी मोर्चा; ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्याची मागणी


नवनीत राणांविरोधात काँग्रेस आक्रमक, निवडणूक आयोगाकडे खासदारकी रद्द करण्याची केली मागणी

खासदार नवनीत राणा आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यामधील वाद आता वाढताना दिसत आहे. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. यावर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत काँग्रेसकडून खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

—————————————————————————————–

जी-20 मुळे भारत जगभारता ‘विश्वमित्र’च्या भूमिकेत

रेल्वे प्लॅटफॉर्मवर काम करणारा गरीब मुलगा संसदेत पोहचला हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे.

“जुन्या संसद भवनात संघर्ष आणि उत्सवाचे वातावरण अनुभवले. जुन्या संसदेत अनेक गोड आणि कडू आठवणी आहेत. जुन्या संसदेतून बाहेर पडणं हा भावनिक क्षण आहे.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आपण ऐतिहासिक संसद भवनातून निरोप घेतोय. पण, जुने संसद भवन येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल.

—————————————————————————————–

न्याय द्यायला एवढा विलंब का होतोय- अनिल देसाई

सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केलंय. कोणाचा व्हीप वैध, कोणाचा अवैध असं असताना न्याय द्यायला एवढा उशीर होणं हे योग्य नाही- अनिल देसाई

—————————————————————————————

पंतप्रधान मोदी संसद भवनात दाखल

—————————————————————————

भाजप धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा कार अपघातात मृत्यू

नाशिकमध्ये कंटेनर कारचा भीषण अपघात झाला, या अपघातात कारमधील चारही जणांचा मृत्यू झाला आहे.


अपात्रतेच्या कारवाईबाबत ठाकरे गटानं अध्यक्षल राहुल नार्वेकर यांना एक अर्ज केला आहे. त्यातून याबाबत काय कारवाई झाली, असा प्रश्न विचारला आहे.

———————————————————————————-

रतलाममधील पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द 

————————————————————————————–

संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता मोदी संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाक़डे देशाचं लक्ष लागलं आहे. पाच दिवस चालणाऱ्या अधिवेशनात 8 विधेयकं मांडण्यात येणार आहेत.


आमदार अपात्रेबाबत आजच सुनावणी

शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे वादावर आज सुप्रिम कोर्ट सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 17 फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं. या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी आहे.

————————————————————————————

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -