घरदेश-विदेशभंडारा-गोंदियाच्या विद्यमान खासदाराला डच्चू

भंडारा-गोंदियाच्या विद्यमान खासदाराला डच्चू

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भंडारा-गोंदिया मतदारसंघाचा उमेदवार अधिकृतपणे जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांना डच्चू देत दुसऱ्या व्यक्तीला तिकीट दिले आहे.

सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. काही वादग्रस्त जागा वगळता सर्व जागांचे उमेदवार प्रत्येक पक्षांकडून निश्चित झाले आहे. दरम्यान, भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना पंचबुद्धे यांची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदास मधुकर कुकडे यांना पक्षाकडून डच्चू दिला गेला आहे. नाना पंचबुद्धे निवडूण येणारच असा विश्वास राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडून व्यक्त केला जात आहे.

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय

गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया या मतदारसंघातून नाना पटोले जिंकूण आले होते. पटोले त्यावेळी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर नाराज झाल्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निश्चय घेतला. त्यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे २८ मे २०१८ रोजी भंडारा-गोंदियामध्ये पोटनिवडणूकीसाठी मतदान झालं होतं. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटेल यांचा पराभव केला. तरिही राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत मधुकर कुकडे यांचे तिकीट कापले असून नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

- Advertisement -

कोण आहेत नाना पंचबुद्धे?

भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून जाहीर झालेले उमेदवार नाना पंचबुद्धे यांचे स्थानीक राजकीय वर्तुळात  दबदबा आहे. ते राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान भंडारा जिल्हाध्यक्ष आहेत. पंचबुद्धे भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी भंडारामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. जिल्हापरिषदचे उपाध्यक्ष असताना त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले होते. त्याच तिकीटावरुन ते जिंकूणही आले होते. जिल्हा परिषद ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. २००४ साली ते भंडारा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडूण आले होते. याचकाळात ते भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री होते. याशिवाय ते याच काळात आघाडीच्या सरकारमध्ये ते शेवटचे सहा महिने शिक्षण राज्यमंत्री होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -