घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही विरोधी, डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा...

Lok Sabha 2024 : प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही विरोधी, डॉ. भालचंद्र मुणगेकरांचा आरोप

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका लोकशाही विरोधी आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला.

मुंबई : लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ही निवडणूक भाजपा विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका लोकशाही विरोधी आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज गुरुवारी (ता. 04 एप्रिल) केला. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका दुर्दैवी असून ती भाजपाला अनुकूल असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. (Lok Sabha 2024 : Dr. Bhalchandra Mungekar made allegation on Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीपासून अंतर राखत लोकसभा निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे केले आहे. वंचितच्या या भूमिकेमुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. मुणगेकर यांनी आज पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे बौद्ध समाजात तीव्र नाराजी असून लोकशाही, संविधान आणि स्वांतत्र्य वाचवण्यासाठी दलित, वंचित, आदिवासी, आल्पसंख्याक, महिला, मागासवर्गीय या सर्व समाज घटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून इंडिया आघाडीला मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : तिकीट कापलेल्यांचे काय होणार? मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासून भाजपाच्या भूमिकेवर टीका केली होती. भाजपा संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे अशी भूमिका ते मांडत होते. परंतु प्रत्यक्षात लढण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांनी भाजपाला अनुकूल भूमिका घेतली. महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा केली. परंतु शेवटी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.

- Advertisement -

वंचितला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 44 लाख मते पडली होती. पण त्यात एमआयएमच्या मतांचा मोठा हिस्सा होता. विधानसभा निवडणुकीत एमआयएमसोबत नसल्याने वंचितच्या मतांमध्ये घसरण होत ही मते 21 लाखापर्यंत खाली आली. लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस आघाडीचा 9 जागांवर पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत 16 जागांवर पराभव झाला. परंतु वंचितमुळे भाजपाच्या एकाही उमेदवाराचा पराभव झालेला नाही. यावरून वंचितची भूमिका ही भाजपाला फायदेशीर अशीच ठरलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी साततत्याने टीकात्मक विधाने करूनही काँग्रेस पक्षाने त्यांना अत्यंत सन्मानाने 17 मार्च रोजीच्या शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेला निमंत्रीत केले. पण त्यासभेत त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांची भूमिका साशंक आहे हे स्पष्ट झाले होते, असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या कॉलर उडवण्याचा उदयनराजेंनी केला सन्मान; म्हणाले – वडिलधारी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -