घरमहाराष्ट्रEknath Khadse : भाजपा प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणतात, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून लवकरच...

Eknath Khadse : भाजपा प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणतात, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून लवकरच…

Subscribe

मुंबई : भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील झालेले उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परततील असे सूचक वक्तव्य त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी केले होते. यानंतर तीन दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा करून आल्यावर माध्यमांशी वक्तव्य करताना म्हटले की भाजपामध्ये जायचं असेल तर मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले होते. त्यामुळे एकनाथ खडसे हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. यानंतर आता त्यांनी स्वत: भाजपात परतणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (lok sabha election 2024 Eknath Khadse BJP entry return soon after discussing with the workers)

एकनाथ खडसे यांनी भाजपात येऊन पुन्हा कामाला सुरुवात केल्यास लोकांना आनंद होणार आहे. लोकांची इच्छा तीच माझी इच्छा आहे, असं सूचक वक्तव्य केलं होतं. यानंतर तीन दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा करून आल्यावर माध्यमांशी वक्तव्य करताना म्हटले होते की, भाजपामध्ये जायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी माझे उत्तम संबंध राहिले आहेत. आताही त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपामध्ये जायचं असेल तर मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही, असं सूचक वक्तव्य केलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : आघाडीत बिघाडी? संजय राऊत म्हणतात, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी

एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यामुळे ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. अशातच एकनाथ खडसे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे. यानंतर आता एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशावर म्हटले की, आज संध्याकाळी जळगावला जाणार आणि उद्या मुक्ताईनगर येथील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे. मात्र भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांना काय जबाबदारी मिळणार किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची काय भूमिका असणरा हे अद्याप स्षष्ट झालेले नाही. असे असले तरी एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

 हेही वाचा – Rohit Pawar : हातात खेकडा पकडणं रोहित पवारांना पडलं महागात; PETA कडून कारवाईची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -