घरमहाराष्ट्रLok Sabha : आघाडीत बिघाडी? संजय राऊत म्हणतात, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद...

Lok Sabha : आघाडीत बिघाडी? संजय राऊत म्हणतात, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी

Subscribe

सांगली आमचीच असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यांनंतर आता त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावे, असे म्हटले आहे.

सांगली : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सांगली आमचीच असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर ते शुक्रवारी तीन दिवसांसाठी चंद्रहार पाटील यांच्या दौऱ्यासाठी सांगली दौऱ्यावर आहेत. अशातच आता त्यांनी वक्तव्य केलं आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हावे. (lok sabha election 2024 Sangli Constituency alliance failure Sanjay Raut says Congress Nationalist Party leaders should stop gimmicks)

उपस्थितांना संबोधित करताना संजय राऊत यांनी पश्चिम महाराष्ट्रातील घराणेशाहीवर टीका केली. त्यांनी म्हटले की, पश्चिम महाराष्ट्रात काहींना लोकशाही मान्य नाही. 50-60 वर्षे आपली घराणी चालली पाहिजे. जोपर्यंत ती घराणी आहेत तोपर्यंत लोकशाही आहे. या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी आणि शिवसेनेनं केलं. शिवसेनेचा इतिहास पाहिला तर सामान्य माणूस, नोकरदार, मजुरी करणाऱ्याला शिवसेनेनं महापौर केला होता. वॉचमॅन, कर्मचारी असे आमदार झाले. मराठवाड्यात साखर कारखान्याच्या गेटवर तिकिट फाडणारे आमदार, मंत्री झाले. एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे. आमच्याकडे पैसे आहेत, बापजाद्यांकडे पैसे आहेत. त्यामुळे आमची पोरं खासदार, मंत्री झाले पाहिजे ही मक्तेदारी शिवसेनेने मोडली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : संजय राऊत सांगलीत असतानाच काँग्रेस नेता म्हणतो, उमेदवारीबाबत चांगली बातमी येईल

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी

चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सांगलीत शेतकऱ्याचा मुलगा खासदारकीला उभा केला आहे. जो दोनदा महाराष्ट्र केसरी झाला. त्याने सांगलीची शान वाढवली असून क्रिडा क्षेत्रात मान वाढवला आहे. हा तरुण काहीतरी करू शकेल आणि आमचा आवाज उचलेल हा विश्वास वाटल्याने उद्धव ठाकरे यांनी सांगली लढवण्याचं ठरवलं. चंद्रहार पाटील आल्यानंतर त्यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन करतो की, तुम्ही तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हा, नाहीतर लोक तुम्हाला सांगलीत माफ करणार नाहीत. चंद्रहार पाटील यांना मोठ्या संख्येने मेहनत करून मताधिक्य मिळवून द्यायला हवं. कवठे महाकांळ मतदारसंघातून प्रामाणिक नेतृत्व पुढे आले आहे. अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना दिली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपात परतणार? आज संध्याकाळपर्यंत प्रवेशाचा मुहूर्त ठरणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -