घरमहाराष्ट्रLok Sabha Election : शरद पवारही बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारी अर्ज दाखल...

Lok Sabha Election : शरद पवारही बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवारी अर्ज दाखल करणार

Subscribe

बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार आणि नणंद -भावजय अशी लढत होत आहे. असे असतानाच शरद पवारही मैदानात उतरले आहेत.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात (7 मे) होणाऱ्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात मतदान होणार आहे. मात्र येथील मतदारसंघ निवडणुकीआधीच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. याठिकाणी पवार विरुद्ध पवार आणि नणंद -भावजय अशी लढत होत आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी मंगळावारी (16 एप्रिल) उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता बारामतीत शरद पवारही मैदानात उतरले आहेत. (Lok Sabha Election 2024 Sharad Pawar in the election fray from Baramati Constituency)

बारातमी मतदारसंघात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बघतोय रिक्षावाला संघटनेकडून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहेत. यातील एका उमेदवाराचं नाव शरद राम पवार असं आहे. शरद राम पवार हे स्वत: रिक्षाचालक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील आंबेगाव बुद्रूक येथे वास्तव्यास आहेत. संघटनेकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी 18 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, एसबीआय बँकेजवळ, चर्च रोड परिसरात दुपारी 12 वाजता प्रचारसभा घेतली जाणार आहे. शक्तिप्रदर्शन केल्यानंतर शरद पवार बारामतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे आता बारामतीत सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि शरद राम पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : द्रौपदीबाबत केलेल्या अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारेंकडून संताप

शरद राम पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, रिक्षावाल्यांच्या अनेक समस्या आहेत. तसेच पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे ओपन परमिट बंद व्हावं यासह रिक्षावाल्यांच्या अनेक मागण्या आहेत. या समस्यांसाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. कारण सध्या फक्त घराणेशाहीचं राजकारण सुरू असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. फक्त निवडणुकीपुरतं या समस्यांकडे पाहिलं जात असल्याचा आरोपही शरद राम पवार यांनी केला आहे.

- Advertisement -

अजित पवारांनी घेतला डमी अर्ज (Ajit Pawar took dummy application)

दरम्यान, अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी शालिनी पवार यांच्यासह इतर नातेवाईक अजित पवारांविरोधात प्रचार करताना दिसत आहे. असे असतानाच आता रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्यासाठी शरद पवार गटाने अर्ज घेतला आहे. सुप्रिया सुळेंचा अर्ज बाद झाला तर खबरदारी म्हणून सुनंदा पवार यांचा अर्ज भरला जाणार आहे. तसेच अजित पवार यांनीही बारामती मतदारसंघातून डमी अर्ज घेतला आहे. दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघातून उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत नागरिक संभ्रमात सापडले आहे.

हेही वाचा – Dignity of Women : अजित पवारांनी घेतली नितीश कुमारांचीच चाल, महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -