घरताज्या घडामोडीPawar Vs Pawar : वाढपी वाढतो म्हणजे त्याने एकट्यानेच स्वयंपाक बनवला असे...

Pawar Vs Pawar : वाढपी वाढतो म्हणजे त्याने एकट्यानेच स्वयंपाक बनवला असे नाही; राजेंद्र पवारांचा अजितदादांना टोला

Subscribe

बारामती (पुणे) – आता सगळेच पवार फिरायला लागले, माझ्याविरोधात प्रचार करायला लागले. मला एकटं पाडलं जात आहे, असे आरोप अजित पवार गेल्या काही दिवसांपासून बारामतीमधील सभांमधून करत आहेत. त्यांच्या आरोपांना राजेंद्र पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बारामतीमध्ये आम्ही अजितदादांचा प्रचार केला नाही, असे नाही. आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवले ते राजकीय क्षेत्रात काम करतात. वाढपी वाढतो म्हणजे त्याने एकट्यानेच स्वयंपाक बनवला असे होत नाही, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

सुप्रिया सुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार 

बारामती लोकसभेची निवडणूक रंगतदार होत चालली आहे. सुप्रिया सुळे या उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या प्रचाराला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, याची माहित देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र पवारांनी अजित पवारांचे आरोप खोडून काढले. तसेच मीच एकट्यानी विकासकामे केली, हा अजित पवारांचा दावाही फेटाळून लावला.

- Advertisement -

राजेंद्र पवार, जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव, अॅड. संदीप गुजर, सत्यव्रत काळे, अॅड. एस. एन. जगताप, वनिता बनकर, प्रियांका शेंडकर, सुभाष ढोले, वीरधवल गाडे यावेळी उपस्थित होते.
राजेंद्र पवार म्हणाले की, आम्ही बारामतीमध्ये नेहमीच प्रचारात असतो. आम्ही बारामतीमध्येच राहतो. सामाजिक क्षेत्रात काम करतो. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीपासून आम्ही प्रचार करतो. रोहित पवारांनी मागच्यावेळी कर्जतमधून निवडणूक लढवली, तेव्हा आम्ही तिथेही गेलो होतो. याआधी बारामती विधानसभा असेल किंवा लोकसभा आम्ही गावागावात आणि घराघरात जाऊन प्रचार केलेला आहे. त्यामुळे आताच प्रचार करत आहे, असे कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : मशीनमध्ये पटापट बटन दाबा, नाहीतर…; अजित पवारांचा मतदारांना इशारा

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजितदादांना गावागावात फिरावं लागतंय:

अजितदादा सारख्या उपमुख्यमंत्री पदावरील नेत्याला मोरगावमध्ये तासभर भाषण का करावे लागले? त्यांना गावागावात का फिरावे लागत आहे, असाही सवाल राजेंद्र पवार यांनी केला.

अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या आरोपांचाही राजेंद्र पवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, अजितदादा वारंवार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल म्हणत असतात की भाषणे देऊन विकास होत नाही. बारामतीत जो विकास झाला तो मी केला आहे. राजेंद्र पवार म्हणाले, जो विकास निधी आला तो एकत्रित आला होता. त्या शरद पवारांचा निधी होता, सुप्रिया सुळेंचा निधी होता. अजित पवार राज्याचे नेते आहेत, त्यामुळे त्यांचा निधीमधील वाटा जास्त असेल. पण स्वंयपाक सर्वांनी मिळूनच बनवला होता. आणि तुम्हाला वाढप्याची भूमिका दिली होती. तुम्ही वाढत होता, म्हणजे सर्व स्वयंपाक तुम्हीचा केला असे होत नाही, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. आता अजित पवार राजेंद्र पवारांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -