घरमहाराष्ट्रLoksabha 2024: बच्चू कडू आक्रमक; नवनीत राणांना पाडण्यासाठी खेळणार नवी खेळी?

Loksabha 2024: बच्चू कडू आक्रमक; नवनीत राणांना पाडण्यासाठी खेळणार नवी खेळी?

Subscribe

अमरावती: भाजपाने नवनीत राणांना अमरावतीमधून लोकसभा निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. भाजपाची सातवी यादी बुधवारी जाहीर झाली त्यात नवनीत राणा यांचं नाव आहे. तसंच त्यांचा पक्ष प्रवेशही झाला आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणांना विरोध दर्शवला होता. आता बच्चू कडू नवनीत राणांना कसं पाडता येईल, यासाठी नवी खेळी खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. आज बच्चू कडू पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. (Loksabha 2024 Bachchu Kadu aggressive Navneet Rana will play a new game to defeat Navneet Rana Dinesh Boob)

आज (29 मार्च) दुपारी बच्चू कडू पत्रकार परिषद घेणार असून मोठ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब हे महाविकास आघाडीकडून अमरावतीमध्ये निवडणूक लढवण्यास उत्सूक होते. पण काँग्रेसकडे हा मतदारसंघ गेला आणि बळवंत वानखेडे यांना उमेदवारी मिळाल्याने दिनेश बूब नाराज झाले.

- Advertisement -

त्यामुळे बच्चू कडू दिनेस बूब यांना प्रहारमध्ये घेणार असल्याचीही चर्चा आहे. आज दुपारी 1 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि प्रहारकडून दिनेश बूब हे अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, अशी माहितीही मिळाली आहे. खासदार नवनीत राणांच्या विरोधात आमदार बच्चू कडूंची ही नवी खेळी असल्याची चर्चा आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

नववीत राणांना तिकिट दिलं ही भाजपाची इच्छा. उमेदवारी दिली म्हणजे विजय होणं असं नाही. आम्ही आमचं काम करू व्यवस्थित. उमेदवारी देऊन विजय मिळवता येतो का? तसं न झाल्यास चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणांना पाडता येतं का? हे आम्ही पाहणार आहोत. चांगला उमेदवार जो जिंकून येऊ शकतो, अशा उमेदवाराचा शोध आम्हाला आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांमुळे ‘ठाकरे’ झाले बरे; वाचा काय आहे प्रसंग)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -