घरमनोरंजनमाधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्पष्टीकरण

माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्पष्टीकरण

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री माधुरी दीक्षित लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपल्या आहेत. माधुरी दीक्षित निवडणूक लढण्यासंदर्भात भाजपमध्ये कोणतीही चर्चा नसल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. रविवारी (15 नोव्हेंबर) क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनचा सामना वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला गेला. यावेळी माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. यामुळे माधुरी दीक्षित निवडणूक लढण्याच्या चर्चा उधाण आले आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिक्रिया माधुरी दीक्षितने त्यावेळी दिली होती. पण आता पुन्हा एकदा माधुरी दीक्षित निवडणूक लढण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट द्यावे, हा निर्णय केंद्राचा असतो. तसेच माधुरी दीक्षित लोकसभा निवडणुकीत लढणार नसल्याच्या चर्चा पक्षा सुरू नसल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अद्वय हिरेंवरील कारवाई राजकीय दबावातून, संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप

गणेशोत्सवाच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासंदर्भाच चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तेव्हा माधुरी दीक्षितला भाजप मुंबईमधून लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्याच्या चर्चा झाली होती.

- Advertisement -

हेही वाचा – स्वस्ताई आणि ‘अच्छे दिन’ हे आजही जनतेसाठी स्वप्नच, ठाकरे गटाची भाजपावर कडाडून टीका

‘या’आधी माधुरी दीक्षित निवडणूक लढण्याच्या चर्चा

यापूर्वी 2019च्या लोकसभा निवडणूकदरम्यान माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली होती. तेव्हा अमित शाह यांनी भाजपच्या ‘संपर्कासाठी समर्थन’ या मोहिमे अंतर्गत माधुरी दीक्षित भेट घेतली होती. यानंतर माधुरी दीक्षित ही पुण्यात लोकसभा निवडणुक लढण्याच्या चर्चा होत्या. या सर्व चर्चांवर माधुरी दीक्षित म्हणाल्या, “मी राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण या फक्त अफवा असून मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढणार नाही. त्यामुळे या अफवा पसरवू नका.”

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -