घरमहाराष्ट्रपुणेMaha Politics : अजित पवारांसमोरच दिलीप मोहिते पाटलांचा अढळरावांना इशारा, म्हणाले...

Maha Politics : अजित पवारांसमोरच दिलीप मोहिते पाटलांचा अढळरावांना इशारा, म्हणाले…

Subscribe

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अढळराव पाटलांचे एकेकाळचे राजकीय शत्रू दिलीप मोहिते पाटील देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

पुणे : माजी खासादर शिवाजीराव अढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अशातच आज (ता. 26 मार्च) शिवाजीराव अढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील देखील उपस्थित होते. या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मोहिते पाटील आणि अढळराव पाटील हे दोन्ही कट्टर विरोधक आपले वैर विसरून एकाच व्यासपीठावर आलेले पाहायला मिळाले. पण यावेळी दिलीप मोहिते पाटील यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांना अजित पवारांसमोरच इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. (Maha Politics : Dilip Mohite Patil warning to Shivajirao Adhalarao Patil in front of Ajit Pawar)

हेही वाचा… Navneet Rana : नवनीत राणांचे भवितव्य 1 एप्रिलला ठरणार, भाजपाकडे पर्यायी उमेदवार तयार

- Advertisement -

माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी दिलीप मोहीते पाटील यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, मलाही शिवसेनेतून राष्ट्रवादीत अजित दादांनी आणले. घडाळ्याच्या चिन्हावर मी कसा उभा राहिलो? याची ही एक मोठी कथा आहे. हे सांगायला कोना ज्योतिषाची गरज नाही. माझे दिलीप वळसे आणि शिवाजी आढळरावांशी कोणते ही वैयक्तिक वैर नाही. भामा आसखेड आणि कळंबोली धरणातील पाणी माझ्या तालुक्याला मिळावे, यासाठी माझा त्यांच्याशी संघर्ष सुरू होता. बोलल्याशिवाय काही मिळत नाही. मी बोलत होतो, त्यामुळे मतभेद दिसून आले. मात्र आता दिलीप वळसे आणि अजित दादांनी पाणी देतो, हे कबूल केलेले आहे. इतकीच माझी भूमिका होती. आता माझा प्रश्न सुटला त्यामुळे हा पुढचा (लोकसभेचा) प्रश्न ही सुटणार आहे, असा विश्वास दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केला.

तर, अजित पवार हे एकमेव असे नेते आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात एक नंबर बनवतील. हे आधीच व्हायला हवे होते. पण उशीर झाला. आता अजित पवारांनी मला ताकद दिली, तशीच ताकद शिवाजीराव पाटील तुम्ही पण द्या. नाहीतर मोहिते गट, अढळराव गट, वळसे गट अशा चर्चा रंगायच्या. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. शिवाजीराव पाटील फक्त तुमचे काम केल्याशिवाय राहणार नाही, मात्र गैरविश्वास दाखवला तर दिलीप मोहिते नाव सांगणार नाही, हेही लक्षात ठेवा, असा इशारा मोहिते पाटलांनी अजित पवारांसमोरच शिवाजीराव अढळराव पाटलांना दिल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -