घरमहाराष्ट्रMVA Mumbai : काँग्रेसलाही सन्मानपूर्वक जागा हव्या; मुंबईत ठाकरे गटाएवढीच आमची ताकद...

MVA Mumbai : काँग्रेसलाही सन्मानपूर्वक जागा हव्या; मुंबईत ठाकरे गटाएवढीच आमची ताकद – वर्षा गायकवाड

Subscribe

मुंबई – महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजून मिटलेला नाही. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच काँग्रेसचीही ताकद आहे. आम्हालाही सन्मानपूर्वक जागा मिळाल्या पाहिजे, असे काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रचाराची रणनीती आणि कार्यककर्त्यांचे मनोमिलन महाविकास आघाडीकडून सुरु आहे. यासाठी आयोजित बैठकीनंतर वर्षा गायकवाड बोलत होत्या.

मुंबईतील सहाही जागा जिंकण्याची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसच्यावतीने वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, अमीन पटेल, चरण सापरा, सुनील शिंदे उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटकडून लोकसभा उमेदवार अरविंद सावंत, सुनील साळवे, माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, सीपीआय, सीपीएम, समाजवादी पार्टी, डीएमके या पक्षांचे नेते उपस्थित होते.

- Advertisement -

आम्हाला सुद्धा सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्या

बैठकीनंतर वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, इंडिया आघाडीची नुकतीच मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते तिथे उपस्थित होते. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची ताकद समसमान आहे, आम्हाला सुद्धा सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्या अशी आमची मागणी आहे. मुंबईमध्ये तीन ते चार मतदारसंघात काँग्रेसचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे आम्हाला सन्मानजनक जागांची मागणी कार्यकर्ते करत आहेत. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा असते की पक्षाला प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे. मात्र काँग्रेसचे ध्येय फार मोठे आहे. आमच्यासमोर या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी वेळप्रसंगी तडजोड करण्याची आमची तयारी आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

अरविंद सावंत यांना पुन्हा खासदार करणार – वर्षा गायकवाड

महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबईची जागा शिवसेना ठाकरेला सोडण्यात आली आहे. येथून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमदेवारी निश्चित मानली जात आहे. त्यांना पुन्हा लोकसभेत पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
मुंबईतील सहाही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्याच आमचा संकल्प आहे. ज्या जागांची आम्ही मागणी करत आहोत, त्या आम्हाला मिळाल्या नाही तरी तिथे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचा आमचे प्रयत्न सुरु आहेत. दक्षिण मुंबईमधून या कामाला सुरुवात केली आहे. मुंबईतील सहाही जागांवर अशाच पद्धतीने काम केले जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : VBA : मविआकडून वंचितला 5 जागांचा प्रस्ताव नाही; प्रकाश आंबेडकर उद्या जाहीर करणार भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -