घरक्रीडाCSK vs GT : गुजरातने नाणेफेक जिंकली, चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण; पाहा दोन्ही...

CSK vs GT : गुजरातने नाणेफेक जिंकली, चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

Subscribe

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) चे संघ इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 17 व्या हंगामातील 7 व्या सामन्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (CSK vs GT Gujarat win toss Chennai invited to bat See the playing XI of both the teams)

हेही वाचा – Mumbai Indians : हार्दिकला हटवून रोहितला कर्णधार बनवल्यास…; माजी दिग्गजांचे मोठे विधान

- Advertisement -

गेल्या वेळी चेन्नईने अंतिम फेरीत गुजरातला हरवून विजेतेपद पटकावले होते. यानंतर सध्या सुरु असलेल्या हंगामात गुजरात संघाचे नेतृत्व शुभमन गिल तर चेन्नई संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे. दोघेही पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवत आहेत. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार हे पाहावे लागेल.

- Advertisement -

सीएसकेला विजयी हॅट्ट्रिक साधण्याची संधी

दरम्यान, गुजरात संघाने 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पहिलाच सीझन जिंकला, तर 2023 मध्ये म्हणजेच दुसऱ्या सीझनमध्ये गुजरातला चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आतापर्यंत दोन्ही संघ 5 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत गुजरातने 3, तर चेन्नईने 2 सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये प्रवेश केल्यानंतर गुजरात संघाने पहिल्या 3 सामन्यात चेन्नई संघाला दणदणीत पराभव केला होता. पण महेंद्रसिंग धोनीच्या संघाने दमदार पुनरागमन केले. पहिले 3 सामने गमावल्यानंतर सलग 2 सामन्यात त्यांनी गुजरातचा पराभव केला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून सीएसके संघाला गुजरातविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे.

हेही वाचा – Bombay High Court : …अन्यथा अवमानना नोटीस बजावू, कायदा हाती घेणाऱ्यांना हायकोर्टाची तंबी

दोन्ही संघांची प्लेइंग-11 

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरेल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अजमतुल्ला ओमरझाई, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर, मोहित शर्मा आणि स्पेन्सर जॉन्सन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -