घरताज्या घडामोडीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता खातेवाटप जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता खातेवाटप जाहीर

Subscribe

हिवाळ अधिवेशनासाठी महाविकास आघाडीने तात्पुरता खातेवाटप जाहीर केलं आहे. येत्या १६ डिसेंबरपासून महाराष्ट्राचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तात्पुरता खातेवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. हे खातेवाटप सहा मंत्र्यांमध्ये होणार आहे. या खातेवाटपामध्ये सहाही मंत्र्यांना प्रत्येकी चार खात्यांची जबाबादारी सोपवण्यात येणार आहे. तर उर्वरीत खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल. या खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून खातेवाटपाच्या यादीवर आज संध्याकाळपर्यंत राज्यपाल स्वाक्षरी करणार आहेत. त्यानंतर याबात अधिसूचना निघणार असल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – पक्षाबाहेर काढण्यासाठी जी नीती चालवली आहे ती बरोबर नाही – खडसे

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील होती. त्यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, सरकार स्थापन होऊन पंधरा दिवस निघून गेले तरी अद्यापही खातेवाटप झालेले नसल्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात होती. मात्र, आता राज्य सरकारकडून तात्पुरता स्वरुपाचे खातेवाटप करण्यात आले आहे.

खातेवाटपाला विलंब का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या राजकीय घडामोडींनंतर अखेर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, राज्यात या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरीही खातेवाटप झालेले नाही. सोमवारी १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर नव्या सरकारने तात्पुरता खातेवाटप जाहीर केले आहे. खरेतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात खातेवाटपावरुन सुरु असलेल्या रस्सीखेचामुळे खातेवाटपाला वेळ लागत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -