घरमहाराष्ट्रखडसे साहेब, यांनी आपल्याला मारले तरी यांच्याकडेच राहावे लागेल - महादेव जानकर

खडसे साहेब, यांनी आपल्याला मारले तरी यांच्याकडेच राहावे लागेल – महादेव जानकर

Subscribe

‘पंकजा तायडी मी दोन्ही बहिणींना सांगतो, आपल्याला न्याय देण्याची भूमिका यांनीच मांडली आहे. त्यामुळे शिव्या जरी दिल्या, मारले तरी आपल्याला यांच्याकडे राहवे लागेल, खडसे साहेब हे विसरता कामा नये’, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने परळी येथील गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यासोबतच राज्यातील इतर ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून भाजप पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आणि इतर काही नेते राज्यातील पक्ष श्रेष्ठींवर नाराज आहेत. याच नाराजीचे पडसाद आज परळी येथील मेळाव्यात पाहायला मिळाले. एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुलेआम टीका केली. त्यांच्याअगोदर महादेव जानकर यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर टीका करायला सुरुवात केली.

- Advertisement -

‘आम्ही जोडलो गेलो ते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच’

मी तर एनडीएचा घटक पक्ष आहे. चंद्रकांत दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही जोडलो गेलो ते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे जोडले गेलो. आणि दादा पुन्हा एकदा जर तुम्ही सत्तेत आला तर आमच्याच मदतीने याल. आमची नियत साफ आणि सरळ आहे. आमच्या नियतीत खोट नाही. म्हणून माझी विनंती आहे की, आज दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्ही मोठे होणार नाहीत. बारामतीची पालखी वाहून, आम्ही मोठे होणार नाहीत. आपला ठराव होताना तायडी मी दोन्ही बहिणींना सांगतो, आपल्या न्याय देण्याची भुमिका यांनीच केलेली आहे. त्यामुळे शिव्या जरी दिल्या, मारले तरी आपल्याला यांच्याकडे राहवे लागेल. खडसे साहेब आपल्याला हे विसरता कामा नये. म्हणून माझी विनंती आहे. विलासराव देशमुख यांच्यासोबतही असेच घडले होते. मी राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष महादेव जानकर तुम्हाला सोडणार नाही. फक्त आता पुन्हा तुम्ही अशी वागणूक देऊ नका, अशी माझी विनंती आहे, असे महादेव जानकर म्हणाले.

‘पक्षांच्या नेत्यांचा अपमान म्हणजे पंकजा ताईंचा अपमान’

यावेळी महादेव जानकर कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे आपला नेता जर मोठा व्हायचा असेल तर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रमुख नेते आपल्या पंकजा ताईंना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत तर त्यांचे स्वागत केले पाहिजे’. ‘तसा मी भाजपचा नाही चंद्रकांत दादा मी माझ्याच पक्षाचा आहे. बांधवानो लक्षात ठेवा, ज्या पक्षाचं नेतृत्व मुंडे साहेबांनी नेतृत्व केलं पक्षाला दिल्लीपर्यंत पोहोचवले त्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान म्हणजे आपल्या पंकजा ताईंचा अपमान हे विसरता कामा नये. हार जीत होत असते त्याला घाबरुन जायचे काही कारण नसते. आपला पक्ष आपली दखल घेत असतो. फक्त आपल्या नेत्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहायचे असते हे परळीकरांनी लक्षात ठेवावे. चार बोट आपण दुसऱ्याकडे करतो तेव्हा एक बोट आपल्याकडे राहते ही गोष्ट परळीकरांनी देखील लक्षात ठेवावी. ताई सक्षम आहेत. निर्णय घेतील, पण आपण डिवचण्याच्या भूमिकेत राहू नका’, असे जानकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -