घरमहाराष्ट्रMaharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक २८ डिसेंबरला, अध्यक्षपदासाठी 'या'...

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक २८ डिसेंबरला, अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा

Subscribe

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. आता सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवीन विधानसभा अध्यक्ष मिळतील. येत्या २८ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

आज शुक्रवारी कामगार सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम ठरला. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या २७ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तथापि, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आहे. त्यामुळे काँग्रेस कोणाच्या नावाची शिफारस अध्यक्षपदासाठी करणार हे पाहावं लागेल.

- Advertisement -

काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी नावं समोर आली आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आहे. तसंच, संग्राम थोपटे आणि के. सी. पाडवी यांची देखील नाव आहे. पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना अध्यक्ष केलं जाऊ शकतं. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहावं लागेल.

आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमावलीत बदल केला आहे. प्रत्यक्ष मतदाना ऐवजी आवाजी मतदानाने यंदा निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -