घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार, नाना पटोलेंची...

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार, नाना पटोलेंची माहिती

Subscribe

विधानसभेच्या अध्यक्षपदी अनुभवी व्यक्तीला असलं पाहीजे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आजपासूनच प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तसेच २७ किंवा २८ तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल. विधानसभा अध्यक्षपदासाठी हाय कमांड आता निर्णय घेणार असून पुढील २ दिवसांमध्ये त्याबाबत आपल्याला माहिती मिळेल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदासाठी हाय कमांड आता निर्णय घेणार असून पुढील २ दिवसांमध्ये त्याबाबत आपल्याला माहिती मिळेल. त्यानंतर त्यांना अधिवेशनाचा कालावधी वाढवणार का? याबाबत पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला असता, नाना पटोले म्हणाले की, विरोधकांनी आपलाही काळ बघितला पाहीजे. भाजपाने कशापद्धतीने पाच वर्ष सत्ता चालवली. तसेच विरोधी पक्षाने अधिवेशन कसे चालवले आहे. हेही महाराष्ट्राला माहिती आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही कशी पद्धतीने अधिवेशन चालवत आहेत. हे सुद्धा संपूर्ण देश बघत आहे.

- Advertisement -

भाजप लोकशाहीची हत्यारे 

लोकशाहीची हत्यारे भाजप असून हे लोकांनीही मान्य केलं आहे. त्यामुळे आपल्यावर आलेला कलंक पुसण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. काल अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये विरोधकांनी जे काही आरोप लावले आहेत. त्या आरोपामध्ये सर्व खोटेपणा आणि आम्ही किती चांगली कामं करतो, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षाला हताशपणा आला

सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षाला हताशपणा आला. तसेच तोही त्यांच्या वक्तव्यामधून दिसून आला. विधानसभा हे सभागृह राजकारणांसाठी नसून वास्तविकता समाजाचं चित्र मांडण्याचं काम विरोधकांनी केलं पाहीजे. त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या आहेत. त्याच्यावर विशेष बोललं पाहीजे. नोकरी भरती आणि कृषी साहाय्यक घोटाळा त्यांच्याच काळात झाला होता, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातील हिवाळी अधिवेशाचा आज तिसरा दिवस आहे. कामगार सल्लागार समितीची आज सकाळी बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम ठरला. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या २७ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचं आंदोलन, सरकारविरोधात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -