घरमहाराष्ट्रमेडिकल बोर्डच्या माध्यमातून 4500 जागांवर भरती करणार; आरोग्यमंत्री गिरीश महाजनांची घोषणा

मेडिकल बोर्डच्या माध्यमातून 4500 जागांवर भरती करणार; आरोग्यमंत्री गिरीश महाजनांची घोषणा

Subscribe

राज्य सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अखेर बंप्पर नोकर भरतीची घोषणा केली आहे. राज्य सरकार आगामी काळात लवकरंच डॉक्टर आणि तंत्रज्ञानासंबंधीत 4500 हजार जागा टीएसच्या माध्यमातून भरणार असल्याची घोषणा बुधवारी आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

विरोधकांकडून नागपूर आरोग्य यंत्रणा, टीईटी घोटाळा, एनआयटी भूखंड वाटप, न्यायप्रविष्ठ प्रकरणांवरून गाजत आहे. यातच आज गिरीश महाजन यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील नोकर भरतीबाबत मोठी घोषणा केली. या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डॉक्टरांची 300 पदे भरली जाणार आहेत. शिवाय 28 टक्के पदे रिक्त आहेत. यात एमपीएससीमार्फत पदभरतीस लागत असल्याने आगामी भरतीसाठी सरकार मेडिकल बोर्ड तयार करणार असल्याची घोषणा महाजन यांनी केली आहे.

- Advertisement -

हॉस्पीटलचे अधिकार वाढले

राज्य सरकारने औषध खरेदीसाठी मोठा बदल केला आहे. त्यात आता हाफकिन 70 टक्के औषध खरेदी करले, तर हॉस्पीटल 30 टक्के औषध खरेदी करेल, हे प्रमाण अनुक्रमे 90 टक्के आणि 10 टक्के होते. आता रुग्णालयांना औषधी खरेदीचे अधिक अधिकार दिले.

या राज्यांतील व्हेंटिलर उपलब्धता वाढणार

औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना अनेकदा तात्काळ व्हेटिंलेर मिळणे शक्य होत नाही. हे पाहता या ठिकाणी लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही महाजन यांनी दिले.

- Advertisement -

दरम्यान यवतमाळमधील वैष्णवी बागेश्वर मृत्यूप्रकरणावर गिरीश महाजन यांनी भाष्य केले, याप्रकरणी डॉक्टरांवर आरोप झाले. त्यानंतर सरकारने म्हैसेकर यांची समिती नेमली. रुग्णालयाचे डीन गुप्ता यांना तात्काळ कार्यमुक्त केले. जे डॉक्टर सपकाळ व्हेंटिलर उपलब्ध करू शकले असते त्यांना पदावरून हटवल्याचेही माहिती महाजनांनी दिली आहे.


सफाई कर्मचाऱ्यांच्या वारशांसाठी गुड न्यूज, शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार नोकरी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -