घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात गुरुवारी १४ हजार ३१७ नव्या रुग्णांची नोंद तर...

Maharashtra Corona Update: राज्यात गुरुवारी १४ हजार ३१७ नव्या रुग्णांची नोंद तर १ लाख अँक्टिव्ह रुग्ण

Subscribe

राज्यात सध्या १ लाख ६ हजार ७० अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. नागपूर, जळगाव, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांनंतर नांदेड जिल्ह्यातही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्यात आज १४ हजार ३१७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात ७ हजार १९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा ९२.९४ टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत २१ लाख ६ हजार ४०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज राज्यात आज ५७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.३२ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ७२ लाख १३ हजार ३१२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २२ लाख ६६ हजार ३७४ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात सध्या ४ लाख ८० हजार ८३ लोक होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार ७१९ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात सध्या १ लाख ६ हजार ७० अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. मुंबईचा विचार केला असता आतापर्यंत ३ लाख ३८ हजार ६४३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईत सध्या १ हजार ५६३ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. ठाण्यात सध्या १ हजार ८२४ तर रायगड जिल्ह्यात १ हजार ४९१ अँक्टिव्हि कोरोना रुग्ण आहेत. कोकणाचा विचार केला असता रत्नागिरी जिल्ह्यात सध्या २१२ तर सिंधुदुर्गात २१४ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर पुण्यात आतापर्यंत ४ लाख २९ हजार ९७३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या पुण्यात २१ हजार २७६ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ३०६ तर नाशिकमध्ये सध्या ५ हजार ३८४ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. नांदेडमध्ये आतापर्यंत २५ हजार ५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या नांदेडमध्ये १ हजार ७०७ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना नावाचा राक्षस पुन्हा डोक वर काढत आहे. पुन्हा संसर्ग पसरतो वेगाने पसरतो आहे. जर लॉकडाऊन नको असेल तर त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. लॉकडाऊनला नागरिक जबाबदार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्यातील एकुण ८० टक्के कोरोनाबाधितांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसत नाही आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना चाचणी करण्यास नकार देऊ नका, कोरोना चाचणी करुन घ्या, हात धुणे, मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे हे जनतेच्या हिताचे आहे.

- Advertisement -

राज्यातील जिल्ह्यातील आजची आकडेवारी

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३३८६४३ ३१५६७१ ११५१९ ८९० १०५६३
ठाणे २८९२६८ २७२५५९ ५८५४ ३१ १०८२४
पालघर ४९६१२ ४७८४० ९३९ १० ८२३
रायगड ७२३२६ ६९२२४ १६०९ १४९१
रत्नागिरी १२२८१ ११६४४ ४२३ २१२
सिंधुदुर्ग ६७३० ६३३७ १७९ २१४
पुणे ४२९९७३ ४००५३४ ८११४ ४९ २१२७६
सातारा ६०३०३ ५६६१७ १८५६ १८२१
सांगली ५१७०० ४९२३१ १७९६ ६७१
१० कोल्हापूर ५००३३ ४८०४० १६८४ ३०६
११ सोलापूर ५९२०८ ५६०२५ १८५५ ५० १२७८
१२ नाशिक १३४४३४ १२६९६४ २०८५ ५३८४
१३ अहमदनगर ७८५०३ ७५०८२ ११६२ २२५८
१४ जळगाव ६७२४४ ६०६५४ १५२८ २० ५०४२
१५ नंदूरबार ११००९ १०११७ २२८ ६६३
१६ धुळे १८२३१ १६४१८ ३३७ १४७४
१७ औरंगाबाद ५७०५४ ५०८४१ १२८४ १४ ४९१५
१८ जालना १६०७४ १५१२३ ३९४ ५५६
१९ बीड २०१८९ १८४५५ ५७५ ११५३
२० लातूर २६५८२ २५२०३ ७१६ ६५९
२१ परभणी ९११४ ७७८० ३०३ ११ १०२०
२२ हिंगोली ५१२७ ४४८१ १०० ५४६
२३ नांदेड २५००५ २२६०२ ६९१ १७०७
२४ उस्मानाबाद १८३६८ १७३४५ ५७४ १६ ४३३
२५ अमरावती ४२०५६ ३७०४० ५५३ ४४६१
२६ अकोला १९३२१ १५११९ ४०० ३७९८
२७ वाशिम १०८८० ९४६५ १६८ १२४४
२८ बुलढाणा १९६०६ १७४८१ २६८ १८५२
२९ यवतमाळ २०९९१ १७८०३ ४९७ २६८७
३० नागपूर १६६८४८ १४९४५२ ३५५७ ३९ १३८००
३१ वर्धा १५४२५ १३९६४ ३१७ ३१ १११३
३२ भंडारा १४३९२ १३६२२ ३१४ ४५५
३३ गोंदिया १४७७७ १४४२३ १७५ १७३
३४ चंद्रपूर २५६७८ २४३०१ ४२० ९५५
३५ गडचिरोली ९२४३ ८९४३ १०३ १८९
इतरराज्ये/ देश १४६ ९० ५४
एकूण २२६६३७४ २१०६४०० ५२६६७ १२३७ १०६०७०

हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत गुरुवारी १ हजार ५०८ नव्या रुग्णांची नोंद

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -