Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Corona Update: कोरानाबाधितांमध्ये घट; रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ टक्क्यांवर

Maharashtra Corona Update: कोरानाबाधितांमध्ये घट; रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ टक्क्यांवर

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात राज्य सरकार आणि प्रशासनाला यश येत आहे. गेले काही दिवस कोरोना बाधितांमध्ये घट होताना दिसून येत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९६ टक्क्यांच्या वर गेलं आहे. राज्यातील मृत्यूंच्या संख्येत देखील आज घट झाली आहे. शनिवारी २२५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर रविवारी १५७ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात आजपयंत एकूण ६०,९४,८९६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.५९ % एवढं झालं आहे. राज्यात आज १५७ करोना बाधधत रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८१,८५,३५० प्रयोगशाळा नमुनयाांपैकी ६३,१०,१९४ (१३.१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६७,९८६ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर ३,११७ व्यक्ती सांस्थातमक
क्वारांटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

आज राज्यात ६,४७९ नवीन रुग्णाांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधधत रुग्णाांची एकूण सांख्या
६३,१०,१९४ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ७८,९६२ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -