घरताज्या घडामोडीकाेराेनामुळे लहान मुले झाली माेटू

काेराेनामुळे लहान मुले झाली माेटू

Subscribe

फास्ट फुड बंद करा, इंडाेर गेम, व्यायामावर भर द्या

लहान मुले सध्या खेळणे विसरले आहेत. सतत टीव्ही आणि माेबाईल समाेर बसत आहेत. पिझ्झा, बर्गर, कुरकुरे, वेर्फस असे पदार्थ खात असल्याने त्यांच्या शरिरावर विपरीत परिणाम हाेऊन त्यांचे वजन वाढत आहे. मुलांना सकस आहार खायला द्या, काेराेनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने सुरक्षा उपयांची अंमलबजावणी करुन त्यांना बाहेर खेळू द्या, असा सल्ला तज्ञ डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे.काेराेनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळांना कुलूप लागले आहे. गेल्या शैक्षणीक वर्षा प्रमाणे या वर्षीही आॅनलाईन शिकवणीचे धडे मुलांना गिरवावे लागत आहेत. त्यामुळे किमान तीन ते चार तास मुलांना माेबाईल, लॅपटाॅप समाेर बसावे लागत असल्याने मुले आधीच कंटाळून जातात. त्यामुळे मुले खेळणे विसरले आहेत. शरीराची हालचाल हाेत नाही. त्यातच पिझ्झा, बर्गर, वडापाव, कुरकुरे वेर्फस खाण्यावर मुलांचा भर असताे. त्याचा विपरीत परिणाम मुलांचे वजन वाढण्यावर हाेत आहे. वजन वाढल्याने मुलांच्या शारिरीक तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मान, डोळे, डाेके दुखणे असे प्रकार समाेर येत आहेत. पालकच याला कारणीभूत ठरत आहेत. पालकांनी आपल्या मुलांना पाेषक आहार खायला द्यावा, बाहेरचे खाद्य पदार्थ देणे बंद करावे, खेळण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे.

वजन वाढण्याचे कारण 

ऑनलाईन शिक्षणामुळे मुले सतत टीव्ही, मोबाईल समोर बसतात. ऑनलाईन शिक्षणामुळे मुल सतत टीव्ही, माेबाईल समाेर बसतात. टीव्ही बघत मुले जेवण करतात. जेवणामध्ये सकस आहार घेत नाहीत. काेराेनामुळे मुले घरातच असल्याने बाहेर जाईन खेळ खेळणे विसरले आहेत. पिझ्झा, बर्गर, वेफर्स, कुरकुरे असे पदार्थ खाण्यावर भर देतात.

वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी

ऑनलाईन शिकवणी नंतर मुलांना काेराेनाचा नियम समजावून बाहेर खेळण्यास पालकांनी मुभा देणे गरजेचे आहे. बाहेर जाता येत नसेल तर घरातच मुलांना खेळायला सांगणे सतत टीव्ही, माेबाईल समाेर बसुन राहू नये. पिझ्झा, बर्गर, वेफर्स, कुरुकुरे खाणे बंद करावे, नेहमीच प्राेटीन युक्त पदार्थ खाण्यासाठी द्यावेत.
ऑनलाईन शिक्षणामुळे जास्तीजास्त वेळ हे माेबाईल, टॅब, लॅपटाॅप यांच्या समाेर असतात. काेराेनामुळे काेणतेच आपालक आपल्या मुलांना बाहेर साेडत नसल्याने मुले टीव्ही समाेर बसतात. त्याच ठिकाणी जेवण जेवतात. शारिरीक खेळापासून लांब राहतात. तसेच त्यांना बॅलन्स डायट देणे गरजेचे आहे. जंक फुड देऊ नये. आहारात प्राेटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा, असे बालराेग तज्ञ डाॅ.विनायक पाटील यांचे म्हणणे आहे.
मुलांना इंडाेर गेम खेळण्यास प्रवृत्त करावे, पालकांनीही त्यांच्यासाेबत मिसळावे. मुलांचे फास्ट फुड बंद करावेत. शरीराला पाेषक असणारे पदार्थ द्यावेत. हिरव्या पालेभाज्या, माेड आलेली कडधान्य, ज्युस, फळ खायला द्यावीत. मुलांच्या साेबत पालकांनीही व्यायामात सहभाग घ्यावा.
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांकडे माेबाईल द्यावा लागताे. काेराेनामुळे सर्वच बंद असल्याने मुलांना घराबाहेर खेळण्यास पाठवता येत नाही. त्यामुळे ते सातत्याने टीव्ही आणि माेबाईलसमाेर अधिक वेळ असतात. हेमंत मोकल, पालक
काेराेनामुळे मुले घरातच असतात. त्यांना बाहेर कसे साेडायचे अशी भीती सातत्याने मनात असते. सध्या ऑनलाईन शिकवणीमुळे मुले अधिक वेळ माेबाईल,लॅपटाॅपवर असतात. न कळत ते विविध गॅझेटच्या आहारी जात आहेत, असे मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे.
                                                                                                                -रत्नाकर पाटील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -