घरताज्या घडामोडी'कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना स्प्रेडर नव्हे तर स्टॉपर व्हा'

‘कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना स्प्रेडर नव्हे तर स्टॉपर व्हा’

Subscribe

नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या परिस्थितीमुळे चिंताजनक वातावरण

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट राज्यात हाहाकार घालत आहे. या लाटेमध्ये कोरोना संसर्गाची बाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती भयावह झाली आहे. कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयात बेड मिळत नाही. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची कमतरता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना स्टॉपर व्हायला पाहिजे कोरोना स्प्रेडर नको असे आवाहन पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारद्वारे राज्यात आज पासून कडक निर्बंध लागू केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोरोना रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करत असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्य शासनातर्फे लागू केलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शासनातर्फे घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे कोरोना रोखण्यास मदत होईल.

- Advertisement -

नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या परिस्थितीमुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये स्थानिक प्रशासनाने देखील कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. यासाठी घरी क्वारंटाईन झालेले लोकं बाहेर पडत असल्यामुळे कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. आपल्याला काही होत नाही. कसला आजार नाही अशी भावना बाळगून सर्व नागरिकर विनाकारण फिरत आहेत. वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे शासनाला दोष न देता आपणही काही नियमांचे पालन केले पाहिजे तसेच ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे आहेत. अशांनी घरात बसले पाहिजेत परराज्यात जाणाऱ्या नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळून घरात बसले पाहिजे. अत्यावश्यक कारण नसताना घराबाहेर टाळले पाहिजे. मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक पूर्णपणे बंद केले पाहिजे तसेच शासनाच्या आवाहनांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीसांद्वारेही करण्यात आले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -