घरताज्या घडामोडीइन्स्टाग्रामवर आत्महत्याची पोस्ट टाकणाऱ्या तरुणीचा महाराष्ट्र सायबर सेलने वाचवला जीव!

इन्स्टाग्रामवर आत्महत्याची पोस्ट टाकणाऱ्या तरुणीचा महाराष्ट्र सायबर सेलने वाचवला जीव!

Subscribe
‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याची पोस्ट टाकून खळबळ उडवून देणाऱ्या पश्चिम बंगाल मधील तरुणीचे प्राण वाचवण्यास महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना यश आले आहे. त्यांनी वेळीच पश्चिम बंगाल पोलिसांची मदत घेऊन या तरुणीला आत्महत्या करण्यापासून रोखून तिचे प्राण वाचवण्यात आले.
पश्चिम बंगालच्या बराकपूर जिल्हयात राहणाऱ्या या तरुणीने इन्स्टाग्राम या सोशल साईडवर आपण आत्महत्या करणार आहोत अशी पोस्ट टाकली होती. इन्स्टाग्रामवर अनेकांनी तिचे राहण्याचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांनी तिला आत्महत्ये सारखे पाऊल उचलू नकोस म्हणून कमेंटपण टाकली होती. याच दरम्यान महाराष्ट्र सायबर सेलचे अधिकारी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सर्व सोशल साईट्सवर लक्ष ठेवून असताना काही अधिकाऱ्यांनी इन्स्टाग्रामवर आलेली आत्महत्येची पोस्ट वाचून या तरुणीला कुठल्याही प्रकारे वाचवायचे असे ठरवून अधिकारी यांनी ही बाब आपले वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या लक्षात आणून दिली.
विशेष पोलीस महानिरीक्षक यादव यांनी संभाव्य घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पुढील पाऊल उचलले.
सायबर सेल मधील तज्ज्ञांकडून संबंधित तरुणीच्या खात्याची माहिती तात्काळ शोधून काढली असता पोस्ट टाकणारी तरुणीने पश्चिम बंगाल मधील बराकपूर येथे राहणारी असल्याचे समजले. त्यांनी तातडीने बराकपूर सायबर सेलचे पोलीस अधिकारी सत्यजित मंडल यांच्याशी संपर्क साधून संबंधित तरुणीचा मोबाईल क्रमांक आणि सविस्तर माहिती त्यांना दिली. तसेच संभाव्य घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. बराकपूर पोलिसांनी तत्परतेने त्या मुलीचा शोध घेऊन तिला आत्महत्येपासून परावृत्त करून तीचे प्राण वाचवले.
या सर्व घटनेत संपर्कासाठी थोडा जरी अवधी लागला असता तरी तरुणीने आत्महत्या करून स्वतःला संपवले, पण सुदैवाने योग्यवेळी संपर्क झाल्यामुळे त्या तरुणीचे प्राण वाचवण्याचे सर्व श्रेय महाराष्ट्र सायबर सेल मधील अधिकारी-कर्मचारी तंत्रज्ञ आणि अत्याधुनिक यंत्रणेला असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी म्हटले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -