घरमहाराष्ट्रMaharashtra Winter Session 2022 : रेल्वे नजीकच्या झोपडपट्टीसंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढणार

Maharashtra Winter Session 2022 : रेल्वे नजीकच्या झोपडपट्टीसंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढणार

Subscribe

रेल्वे नजीकच्या झोपडपट्टीसंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढणार – मंत्री उदय सामंत


महिला आरक्षणात पुरुषांना उमेदवारी मिळणार नाही- देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

ठराव संमत झाल्यानंतर विधानसभेत घोषणाबाजी

सीमाप्रश्नी विधानसभेत एकमताने ठराव मंजूर

- Advertisement -

बेळगाव, निपाणीसह ८६५ गावं महाराष्ट्रात आणण्याचा ठराव

ठराव एकमताने मंजूर झाल्याने मुख्यमंत्र्यांकडून आभार


उद्धव ठाकरे विधानभवन परिसरात दाखल

खटल्या लढण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती – मुख्यमंत्री

ज्येष्ठ वकील हरिश साळवेही लक्ष घालणार

विधानसभेत सीमाप्रश्नी ठरावाचं वाचन सुरू

सीमावादाला जाणीवपूर्वक चिथावणी देण्याचा प्रयत्न


मराठीची दूर्दशा करणारा ठराव नको – अजित पवार

सीमाप्रश्नी ठरावात अनेक चुकीची मराठी शब्द

व्याकरणाच्या चुका सुधारण्यात येतील- उपमुख्यमंत्री

व्याकरणापेक्षा भावना महत्त्वाच्या – उपमुख्यमंत्री


बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मुंबईतील विधानभवनात लावणार

हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मुंबईतील विधानभवन येथील मध्यवर्ती सभागृहात बसवणार

अनावरण सोहळा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार


१७ उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश

९४ उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मॅटमध्ये सुनावणी होणार

त्यांना नोकऱ्या मिळण्याकरता शासन प्रयत्न करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही सभागृहात अनुपस्थित

आम्हाला माहितच नव्हतं आज तुम्ही सभागृह चालू देणार – देवेंद्र फडणवीस

मला वाटलं चालणार नाही, पण चालतंय म्हणून मी घाईघाईत आलो


विरोधकांचं टाळ बजाओ आंदोलन

विधिमंडळ परिसरात विरोधकांचे आंदोलन

मविआ आमदारांचे पायऱ्यांवर आंदोलन

टाळ वाजवत सरकारविरोधात घोषणा


चेंबूरच्या जागेत पुन्हा सर्व्ह होणार- देसाई

सिंधी कॅम्पातील११५६ सनदांपैकी ९९६ रहिवासी आणि १६० दुकान गाळे आहेत. रहिवाशांच्या सहमतीने गाळे वितरीत केले आहेत. या ठिकाणी सर्वे करायला लोकांनी विरोध केला. ही जागा केंद्राची आहे. सर्व्हे करण्याकरता केंद्राने राज्याला अधिकार दिले आहेत. तिथे तीनवेळा सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी विरोध केला. अधिकाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. जागा नियमित करण्यासाठी सर्व्हे करत असल्याचं सांगितल्यानंतरही सर्व्हे करू दिला नाही – शंभूराज देसाई


शेतकऱ्यांना उर्वरित नुकसानभरपाई लवकरच – शंभूराज देसाई

मविआच्या काळातील घोषणांची आम्ही पूर्तता केली


राज्यातील पौराणिक मंदिरांच्या संवर्धानाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू

पौराणिक वास्तू, मंदिरांच्या संवर्धनासाठी तीन वर्षात १ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम उपलब्ध होईल. जिल्ह्यांच्या संदर्भात या तीन टक्क्यांमध्ये त्यांच्या जिल्ह्यातील जे जे प्रस्ताव करता येईल ते आपल्या जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यात प्रस्ताव करावेत. सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वास्तूंसाठी विभाग निश्चित उभा राहिल – सुधीर मुनगंटीवार


विधानसभेचं कामकाज सुरू


 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -