घरमहाराष्ट्रविधानपरिषद निवडणुकीचा धुरळा, आज मतदान

विधानपरिषद निवडणुकीचा धुरळा, आज मतदान

Subscribe

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा यात समावेश आहे. 24 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

बीडच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

- Advertisement -

बीडमधली निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची म्हणून पाहिली जातेय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघा भावंडांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे उमेदवार सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात ही लढत होणार आहे. रमेश कराड यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीवर अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवली.

सुरेश धस, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस

कोकणात राणे तटकरेंच्या बाजूने

- Advertisement -

कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विरूद्ध शिवसेनेचे राजीव साबळे अशी लढत आहे. शिवसेनेला विरोध म्हणून नारायण राणेंनी सुनिल तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

नाशकात भाजप काढणार सेनेवर वचपा

नाशिकची निवडणूक देखील तितकीच महत्त्वाची आहे. पालघरमध्ये शिवसेनेने केलेल्या राजकीय कोंडीचा वचपा काढण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पालघरमध्ये दिवंगत भाजप नेते चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेने उमेदवारी दिली. परिणामी भाजपची चांगलीच कोंडी झाली. नाराज असलेल्या श्रीनिवास वनगा यांनी मातोश्रीवर शिवसेनेनेत प्रवेश केला होता.

अशी असणार लढत

उस्मानाबाद-लातूर-बीड – सुरेश धस (भाजप) विरुद्ध अशोक जगदाळे (अपक्ष) – राष्ट्रवादीचा पाठिंबा

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) विरुद्ध राजीव साबळे (शिवसेना)

नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

परभणी-हिंगोली – विप्लव बजोरिया (शिवसेना) विरुद्ध सुरेश देशमुख (काँग्रेस)

अमरावती – प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध अनिल मधोगरिया (काँग्रेस)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – इंद्रकुमार सराफ (काँग्रेस) विरुद्ध रामदास अंबटकर (भाजप)

कार्यकाळ संपणारेआमदार

अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) – राष्ट्रवादी काँग्रेस

जयंत जाधव (नाशिक) – राष्ट्रवादी काँग्रेस

बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली) – राष्ट्रवादी काँग्रेस

दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड) – काँग्रेस

प्रवीण पोटे (अमरावती) – भाजप

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -