घरमहाराष्ट्रमतदारांसाठी दौरे आणि पार्ट्यांचा फड

मतदारांसाठी दौरे आणि पार्ट्यांचा फड

Subscribe

राज्यात कमालीची उत्सुकता गाठलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निडणुकीच्या निकालावेळी धक्का बसेल, या व्यक्त केलेल्या मतानंतर निवडणुकीत दगाफटका नको म्हणून भाजपने या निवडणुकीतल्या मतदारांना दौरे आणि पार्ट्यांचा फड सुरू केला आहे. भाजपच्या या देकारानंतर राष्ट्रवादीनेही खबरदारी घेत आपल्या पंचायत सदस्यांसाठी दौरे आयोजले आहेत. भाजपचा एक गट गोव्याला तर दुसरा गट काश्मीरला रवाना झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी- भाजप आमनेसामने
राज्य विधानपरिषदेची निवडणूक २१ मेला होत आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चुरस असलेल्या लातूर-उस्मानाबाद-लातूर च्या निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांपुढे ठासून उभे आहेत. एकमेकांच्या उमेदवारांना आपल्याकडे खेचून घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने एकमेकांना आव्हान दिले आहे. यात आपली फसगत व्हायला नको म्हणून दोन्ही पक्षांनी खबरदारी घेतली आहे. कुठल्याही परिस्थितीत दगाफटका बसायला नको, म्हणून दोन्ही पक्षांनी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांसाठी फड सुरू केले आहेत. लातूर महानगरपालिकेचे भाजपचे निवडून आलेले ३६ आणि तीन स्वीकृत नगरसेवक अशा ३९ नगरसेवकांना त्या पक्षाने रिसॉर्टला पाठवले आहे.

- Advertisement -

पक्षाकडून अभ्यासदौऱ्याचा घाट
जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या सदस्यांसाठी एका गटाने गोव्याचा ‘अभ्यासदौरा’ घडवून आणला असून, दुसरा गट काश्मीरच्या दौऱ्यावर गेला असल्याचे सांगण्यात आले. भाजपने यासाठी प्रशिक्षण शिबिराचे नाव दिले आहे. हे प्रशिक्षण कुठे सुरू आहे, ते मात्र भाजप नेते सांगायला मागत नाहीत. पक्षाचा आदेश आला, आम्ही त्यांना शिबिराला पाठवले, असे एका पदाधिकाऱ्याने बोलताना स्पष्ट केले. भाजपचे लातूरमधील नगरसेवक गोव्याला गेले असून, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची व्यवस्था एका अलिशान हॉटेलात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या नगरसेवकांना थेट २१ मे रोजी मतदान केंद्रावर आणले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -