घरदेश-विदेशकॉपी रोखण्यासाठी स्वच्छतागृहात 'सीसीटीव्ही'

कॉपी रोखण्यासाठी स्वच्छतागृहात ‘सीसीटीव्ही’

Subscribe

महाविद्यालयातील खळबळजनक घटना

विद्यार्थी कॉपी करण्यासाठी स्वच्छतागृहाचा देखील वापर करतात. ते कुठेतरी थांबावे या उद्देशाने उत्तर प्रदेशमधील अलीगड येथील धर्म समाज पदवी महाविद्यालयाच्या पुरुषांच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले होते. हे प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जाब विचारल्यास, विद्यार्थी स्वच्छतागृहात जाऊन कॉपी करतात. हा प्रकार रोखण्यासाठी स्वच्छतागृहात सीसीटीव्ही लावल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालय प्रशासनाने दिले आहे.

प्रशासनाविरोधात कारवाई करू

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधील अलीगड येथील धर्म समाज पदवी महाविद्यालयाच्या पुरूषांच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याचे प्रकरण समोर आले. स्वच्छतागृहात सीसीटीव्ही लावल्याचे समजल्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी याचा विरोध करण्यास सुरूवात केली आहे. सौरभ चौधरी या विद्यार्थ्याने हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा असल्याचे म्हटले आहे. तर संजीवकुमार या विद्यार्थ्याने या प्रकरणाचा निषेध करत स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनुचित असल्याचे सांगितले आहे. जर हे सीसीटीव्ही काढले नाहीतर प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांनीच केली होती तक्रार

- Advertisement -

महाविद्यालयात एकूण तीन स्वच्छतागृह आहेत. वॉशरूममध्ये कॅमेरा लावणे चुकीचे नाही. कॅमेरा यूरिनलच्या मागे फोकस करतो. फुटेज पाहण्यासाठी वेगळी खोली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर याचा कोणताच परिणाम होणार नाही. विद्यार्थी कॉपी लपवून ठेवतात आणि त्याकरता स्वच्छतागृहाचा वापर करतात. अशी तक्रार विद्यार्थ्यांनीच केली होती. त्यांच्या तक्रारीनंतरच महाविद्यालय प्रशासनाने हा निर्णय घेत स्वच्छतागृहात सीसीटीव्ही लावले आहेत.
– प्रकाश गुप्ता, महाविद्यालयाचे प्राचार्य

सीसीटीव्ही कॅमेरे लावणे चुकीचे

विद्यार्थी महाविद्यालय प्रशासनाविरोधात मानहानीचा खटला दाखल करू शकतात. स्वच्छतागृहात कॉपी रोखण्यासाठी अनेक पद्धती आहेत. पण सीसीटीव्ही कॅमेरे लावणे चुकीचे आहे.
– मानवेंद्र प्रताप सिंह, राष्ट्रीय अल्पसंख्यांक शिक्षण समितीचे सदस्य 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -