घरमहाराष्ट्र'फडणवीसांसोबत वाद, पण NDA ची साथ सोडणार नाही'

‘फडणवीसांसोबत वाद, पण NDA ची साथ सोडणार नाही’

Subscribe

...त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार

‘माझे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भांडण जरूर आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार आहे.’, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. जानकर यांनी ३ तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबते झाली. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचे जाहीर केले. मात्र तरीही चर्चा सुरूच आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवारांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे.

आपण सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतच मध्येच आहोत आणि पुढेही राहणार आहे, असे ते म्हणाले. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचे नसते, असे जानकर म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचे जानकरांनी सांगितले. माझे देवेंद्र फडणवीसांबरोबर भांडण आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही.

- Advertisement -

धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या जानकरांना डावलून फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्याने जानकर नाराज आहेत. पण माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात जानकरांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला हाणला.

जानकर-पवार भेटीने चर्चेला उधाण

राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आलं आहे. ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचं जानकर सांगत असले तरी जानकर हे लवकरच महाआघाडीत सामिल होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -