घरताज्या घडामोडीWeather update: महाराष्ट्रात येत्या ४८ तासांसाठी पाऊस अन् हिटवेव्ह अलर्ट ! कोणत्या...

Weather update: महाराष्ट्रात येत्या ४८ तासांसाठी पाऊस अन् हिटवेव्ह अलर्ट ! कोणत्या जिल्ह्यांना फटका?

Subscribe

राज्यात उकाड्याच्या वातावरणामुळे एकीकडे महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे, तर दुसरीकडे अवेळी बत्ती गुलच्या प्रकाराने हैराण आहे. अशातच आगामी दोन दिवसांमध्ये राज्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. राज्यात येत्य ४८ तासांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही वर्तवली आहे. राज्यात एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा अंदाज हवामान विभागाने मांडला आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये संमिश्र अशा रूपाचे वातावरण राज्यात पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

येत्या ४८ तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व संलग्न भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पाच दिवस विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) मार्फत महाराष्ट्रासाटीचा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. याआधीही राज्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचे वातावरण राहिले आहे. येत्या दिवसांमध्ये विदर्भात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या उकाड्यात आणखी भर पडणार आहे.

कुठे पाऊस कुठे उष्णतेची लाट ?

राज्यात मध्य महाराष्ट्रात सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातुर या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -