घरताज्या घडामोडीभाजपला पुन्हा राज्यसभेसारखं यश मिळणार नाही, वडेट्टीवारांचा दावा

भाजपला पुन्हा राज्यसभेसारखं यश मिळणार नाही, वडेट्टीवारांचा दावा

Subscribe

आमचा सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी कुठेही अडचण वाटत नाही. महाविकास आघाडीला ज्यांनी समर्थन दिले आहे. ते पुन्हा आम्हाला मतदान करतील. पुढील अडीच वर्ष आमचेच सरकार आहे. असे वडेट्टीवार म्हणाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक होणार आहे. भाजपकडून ५ तर महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार देण्यात आले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी रणनिती आखून महाविकास आघाडीला धक्का दिला होता. यानंतर आता विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा राज्यसभेसारखं यश मिळणार नाही असा दावा काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधान परिषदेवर माहिती दिली आहे. राज्यसभेमध्ये काही तांत्रिक गोष्टींमुळे भाजपचा विजय झाला आहे. मतांच्या संख्येनुसार झालेला विजय नाही. त्यांना मत पडली आणि आम्हाला पडलेल्या मतांमध्ये फरक आहे. गणितानुसार त्यांचा विजय तांत्रिक आहे. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडे संख्याबळ नाही. भाजपला २२ मत पहिल्या पसंतीची लागतात. त्यांच्याकडे ४ उमेदवार निवडून आल्यावर पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी २२ मतांची गरज आहे. तर काँग्रेसला ८ ते १० मतांची गरज आहे. आमच्यासोबत असलेले छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आम्हाला पाठिंबा देतील. वैचारिक द्रष्टिने आमच्यासोबत अपक्ष येतील असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -

महाविकास आघाडीला गुप्त मतदानाचा धोका नाही. एका जागेसाठी निवडणूक चुरशीची आहे. या एका जागेसाठी मतदानासाठी संपर्क साधण्यात येत असेल तर त्यात काही वावगं ठरणार नाही. आमचा सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी कुठेही अडचण वाटत नाही. महाविकास आघाडीला ज्यांनी समर्थन दिले आहे. ते पुन्हा आम्हाला मतदान करतील. पुढील अडीच वर्ष आमचेच सरकार आहे. असे वडेट्टीवार म्हणाले.

महाविकास आघाडीची बैठक झाली. यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही बैठक जिंकतो आहोत. जरी काँग्रेसचा उमेदवार असला तरी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. सगळ्यांची त्याला सहमती आहे. मतांची जुळवाजुळव करावी लागते. शिवसेनेकडे अधिक मत आहेत. राष्ट्रवादीची २ मते आली तर आम्हाला २ ते ३ मत लागतील. काँग्रेसच्या उमेदवाराला अडचण येणार नसल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : मविआमध्ये अपक्ष आमदारांची पळवापळवी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदारांशी संपर्क

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -