घरमहाराष्ट्रधनादेश न वटल्यास वीज ग्रहकांना बसणार १५०० रुपयांचा दंड

धनादेश न वटल्यास वीज ग्रहकांना बसणार १५०० रुपयांचा दंड

Subscribe

वीज ग्राहकांना आता चेक बाऊंस झाल्यास १५०० रुपयांचा दंड बसणार आहे. बहूसंख्य ग्राहकांकडून मिळालेले चेक बाऊंस होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊंस) झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे.महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे व दि. १ नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता चेक बाऊंस झाल्यावर ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

दरमहा चेक होत होते बाऊंस

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील सुमारे १ लाख ७५ हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशद्वारे दरमहा वीजबिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे ३५०० ते ४००० धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊंस होत आहेत. त्यासाठी संबधीत वीजग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड लावण्यात येत होता. मात्र आता 1 नोव्हेंबरपासून धनादेशाचा अनादर झाल्यास १५०० रुपये किंवा बॅक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड म्हणून लावण्यात येत आहे.वीजबिल भरण्याच्या अंतीम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधीत ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाऊंस झाला आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

- Advertisement -

घरबसल्या वीजबिल भरा

महावितरणचे घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल अॅ्प किंवा ईसीएसद्वारे सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल अॅापच्या माध्यमातून पुणे परिमंडलात सद्यस्थितीत सुमारे ९ लाख ५२ हजार वीजग्राहक सुमारे १७७ कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. तसेच ईसीएसद्वारे देयके भरणासाठी सुमारे सव्वादोन लाख वीजग्राहकांनी नोंदणी केलेली आहे आणि घरबसल्या दरमहा सुमारे २० कोटी रुपयांचा वीजदेयकांचा भरणा ईसीएसधारक करीत आहेत. त्यामुळे धनादेशऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -