घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात महेश शिंदेंचं लाक्षणिक उपोषण

Maharashtra Assembly Winter Session 2021: महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात महेश शिंदेंचं लाक्षणिक उपोषण

Subscribe

राज्यात हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील नेत्यांकडून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. यामध्ये विजेची देयके भरणे, ओबीसी आरक्षण, बनावट कंपन्या, आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षातील नेत्यांकडून आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी आपल्याच सरकारविरोधात मंत्रालयात आंदोलन सुरू केलं. त्यामुळे महेश शिंदेंच्या आंदोलनाची चर्चा अधिवेशन परिसरात सुरू झाली.

महावितरणाच्या गलथान कारभाराविरोधात जाहीर निषेध

छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्या जवळच्या पायऱ्यांवर बसून महेश शिंदे यांनी आंदोलन सुरू केलं. सामान्य ग्राहकांच्या वीज बिलाची लूट थांबवा, शेतकऱ्यांची वीज तोडणी आणि महावितरणाच्या गलथान कारभाराविरोधात जाहीर निषेध करत त्यांनी मूक आंदोलन सुरू केलं आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून शिवसेनेच्याच आमदाराने आंदोलन पुकारल्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरलं आहे.

- Advertisement -

प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया…

दरम्यान, महेश शिंदे यांच्या आंदोलनानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाड सरकार विरोधकांचं तर ऐकत नाहीत. परंतु किमान आता आपल्या पक्षातील आमदारांचं तरी ऐकतील अशी खरमरीत टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: आयसीयूमध्ये सॅनिटायझरचा वापर जास्त झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आग – नाना पटोले

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -