घरताज्या घडामोडीवृद्धापकाळात दर महिन्याला पाहिजेत पैसे?; आजचं सरकारच्या या योजनेत गुंतवा पैसे; होईल...

वृद्धापकाळात दर महिन्याला पाहिजेत पैसे?; आजचं सरकारच्या या योजनेत गुंतवा पैसे; होईल मोठा फायदा

Subscribe

केंद्र सरकारकडून अनेक खास योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे गुंतवणुकदारांना मोठा फायदा होतो. आर्थिक आधार देण्यासोबत सरकार सर्वसामान्यांसाठी पेन्शनबाबत अनेक योजना सुरू केल्या होत्या. ज्यामुळे लोकं वृद्धापकाळात लोकांना त्याचा खूप मोठा फायदा होतो. गेल्या १२ वर्षांपासून लोकांना नॅशनल पेन्शन योजना (NPS Scheme) चांगला रिटर्न देत आहे. याच योजनेबाबत आज आपण जाणून घेणार आहोत…

लवकर करा गुंतवणूक

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (PFRDA) चेअरमॅन सुप्रतिम बंदोपाध्याय म्हणाले की, राष्ट्रीय पेन्शन प्रणालीने (National Pension System) गेल्या १२ वर्षांपासून लोकांना चांगले रिटर्न दिले आहेत. ते पुढे म्हणाले की, या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने लवकर या योजनेत गुंतवणूक करणे सुरू केले पाहिजे.

- Advertisement -

बंदोपाध्याय म्हणाले की, या योजनेत तुम्हाला फक्त १ हजार रुपये द्यावे लागतात. यामध्ये कोणतेही निश्चित योगदान नसते. तुम्ही पीएमएलएचे पालन करत तुम्ही कोणत्याही स्तरावर पैसे भरू शकता.

माहितीनुसार, २००४मध्ये एनपीएस सर्वात पहिल्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केला होता, परंतु त्यानंतर २००९मध्ये सर्वसामान्यांना यामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही निवृत्त होईपर्यंत यात गुंतवणूक करू शकता. हा एक असा फंड आहे, ज्यामध्ये तुम्ही थोडी-थोडी गुंतवणूक करू शकता आणि निवृत्त होईपर्यंत फंड तुमचा मोठा होतो. गुंतवणुकीची सुरुवात जेवढ्या अगोदर कराल, तेवढा जास्त फायदा होईल.

- Advertisement -

या योजनेचा फायदा १८ ते ६५ वर्षातील भारतीय नागरिक घेऊ शकतात. एक व्यक्ती फक्त एकच एनपीएसचे खाते खुले करू शकतो. यामध्ये ज्वाईंट अकाऊंट खोलू शकत नाही.


हेही वाचा – मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांक लिंक करणारे विधेयक राज्यसभेत मंजूर, आता राष्ट्रपतींकडे पाठवले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -