घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Winter Session 2021: आयसीयूमध्ये सॅनिटायझरचा वापर जास्त झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आग...

Maharashtra Assembly Winter Session 2021: आयसीयूमध्ये सॅनिटायझरचा वापर जास्त झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आग – नाना पटोले

Subscribe

महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. भंडारा या जिल्ह्याचा उल्लेख या ठिकाणी मगासपासून केला जातोय. जेव्हा ते हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते. त्यावेळी त्या हॉस्पिटलचं फायर ऑडिट केलं गेलं नव्हतं. परंतु त्याचा अहवाल आल्यानंतर असं समजलं की, कोरोनाच्या काळात सॅनिटायझरचा वापर झाल्यामुळे आणि वातानुकुलीत हवेत हा सॅनिटायझर जमा झाला. तसेच सॅनिटायझर हा ज्वलंत पदार्थ आहे. त्यामुळे समोर आलेल्या अहवालानुसार त्याठिकाणी अशा पद्धतीच्या आगीच्या घटना घडलेल्या आहेत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीबाबत सभागृहात सांगितंल की, आयसीयूमध्ये सॅनिटायझरचा वापर जास्त झाल्यामुळे येथील हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. तसेच सॅनिटायझर ज्वलंत असल्यामुळे अशा प्रकारची घटना आयसीयूमध्ये घडली आहे, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

नाना पटोलेंनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया…

नाना पटोले यांच्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नाना पटोलेंनी भंडारा येथील हॉस्पिटलचा उल्लेख केला आहे. परंतु अशाच प्रकारची दुर्घटना वसई-विरार येथील महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घडली. नाशिकमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली. त्यानंतर २ मे २०२१ रोजी तातडीने एक नवीन परीपत्रक जारी करण्यात आलं होतं. यासंबंधीत सर्व विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तासंह फायर ऑडीट झालं पाहीजे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच थर्ड पार्टी ऑडीट करणाऱ्या एजन्सी देखील महापालिका स्थरावर नेमण्यात आल्या होत्या. परंतु ऑक्सिजन पातळी जास्त असल्यामुळे आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे अवहालातून निदर्शनास आले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील अनेक हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यासंबंधित आज सभागृहामध्ये चर्चा करण्यात आली. विशेषत: भंडारा जिल्ह्यातील घटनेचा उल्लेख केला जात होता. परंतु यावर नेमकी आग कशामुळे लागली याचं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  देवेंद्र फडणवीसांच्या मागणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचं निलंबन, एकनाथ शिंदेंचा निर्णय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -