घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे

पिंपरी-चिंचवडमध्ये महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे

Subscribe

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भाजपाचे उमेदवार बहुमतांनी महापौर पदी विराजमान झाले तर उपमहापौर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भाजपाचे उमेदवार बहुमतांनी महापौर पदी विराजमान झाले तर उपमहापौर हे बिनविरोध निवडून आले आहेत. आज झालेल्या विशेष महासभेत भाजपाच्या उमेदवार जेष्ठ नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे भाजपाच्या माई ढोरे यांना ८१ तर राष्ट्रवादीच्या माई काटे यांना ४१ मत मिळाली आहेत. त्यांचा विजय ४० मतांनी झाला आहे. तर तुषार हिंगे हे बिनविरोध निवडून आले आहेत. महापौर निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित दिसले या निमित्ताने महा’विकास’आघाडी पाहायला मिळाली. तर मनसे चा एकमेव नगरसेवक सचिन चिखले हे गैरहजर राहिले.

…अशी झाली निवडणूक

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या भाजपाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे भाजपा पक्षाचा महापौर आणि उपमहापौर पदी उमेदवार विराजमान होणार हे निश्चित होते. केवळ शिक्का मोर्तब होणे बाकी होते. आज झालेल्या विशेष महासभेत पीठासीन अधिकारी शंतनू गोयल यांनी काम पाहिले. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी गोयल यांनी १५ मिनिटे माघार घेण्यासाठी दिले मात्र राष्ट्रवादीने माघार घेतली नाही. त्यामुळे महापौर पदाची निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या नगरसेविका माई ढोरे यांना ८१ तर राष्ट्रवादीच्या माई काटे यांना ४० मत मिळाली. यावेळी राज्यात सत्तापेच सोडवण्यासाठी एकत्रित आलेली महा’विकास’आघाडी पाहायला मिळाली. शिवसेनेच्या सहा नगर सेवकांनी राष्ट्रवादीला मत दिली. तर मनसे चे एकमेव नगरसेवक सचिन चिखले हे गैरहजर राहिले.

- Advertisement -

त्यानंतर झालेल्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. तेव्हा, पीठासीन अधिकारी यांनी माघार घेण्यासाठी १५ मिनिटे दिली, त्यावेळी राष्ट्रवादीचे उपमहापौर पदाचे उमेदवार नगर सेवक राजू बनसोडे यांनी अचानक माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे नगरसेवक तुषार हिंगे हे बिनविरोध निवडून आले. दरम्यान, उपमहापौर पदी तुषार हिंगे यांची लॉट्रिच लागली म्हणावी लागेल. अर्ज भरायच्या वेळी नगर सेवक शीतल शिंदे हे गैरहजर असल्याने येन वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी नगरसेवक तुषार हिंगे यांना उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. तुषार हिंगे हे क्रीडा समितीचे सभापती आहेत. सध्या त्यांच्याकडे दोन जबाबदाऱ्या आल्या आहेत.


हेही वाचा – जाणून घ्या कोणत्या शहराचं महापौरपद कोणाकडे?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -