घरCORONA UPDATEकोकणातल्या शेतकऱ्यांची मालवाहतुकीसाठी एसटीची मागणी!

कोकणातल्या शेतकऱ्यांची मालवाहतुकीसाठी एसटीची मागणी!

Subscribe

गेल्या महिन्याभरापासून कोरोनामुळे देशासह राज्यात जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आता ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक आणि छोट्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच वाहतूक बंद असल्याने आंबा आणि इतर शेतीमाल बाजारात पोहोचू शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसानाला समोर जावे लागत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने कोकणातील शेती मालासाठी एसटी सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेती माल शहरापर्यंत पोहोचवता येईल, अशी मागणी कोकणातील शेतकऱ्यांनी आणि आंबा उत्पादकांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.

कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे सेवेसह सार्वजनिक वाहतूक बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा माल एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन जाणं अशक्य होऊन बसलं आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका कोकणातील आंबा उत्पादकाला आणि नाशिकच्या द्राक्ष बागायती शेतकऱ्यांना बसला आहे. नाशिक आणि कोकणातील शेतकऱ्यांसाठी प्रमुख बाजारपेठा मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात आहेत. या लॉकडाऊनमुळे निर्यात बंद झाली आणि देशांतर्गत मार्केटमधल्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. झाडावरच आंबा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली. शासनाने आंबा हंगाम सुरळीत सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून निर्यातीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी मुंबईमध्ये विशेष कक्ष तयार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये आंबा विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे. गाव खेड्यात जाणारी एसटी शेतकऱ्यांसाठी सुरु करावी, अशी मागणी सध्या अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

- Advertisement -

छोट्या शेतकर्‍यांवर संकट

उन्हाळ्याचा हंगाम लक्षात घेत बऱ्याच शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची लागवड केलेली आहे. मात्र, आता पालेभाज्या उत्पन्न निघाल्यानंतर कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे खासगी वाहनंसुद्धा माल बाजारात घेऊन जाण्यास नकार देतात. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जर खेड्यापाड्यात जाणारी एसटी शेतकऱ्यांसाठी सुरू झाली तर शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. तरी शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हातील खरोते गावच्या शेतकऱ्यांनी दिली आहे.

देशावर कोरोनाचे संकट आले आहे. याचा सर्वाधिक फटका गोरगरीब शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाउन वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरी शासनाने ग्रामीण भागात धावणारी एसटी शेतकऱ्यांच्या माल वाहतुकीसाठी सुरू करावी. जेणेकरून शेतकऱ्यांचा माल शहारापर्यंत पोहोचू शकेल.

शिवाजीदेव चौघुले, शेतकरी, राजापूर-रत्नागिरी

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -